संयुक्त अमिराती येथे सुरू असलेल्या आशिया चषक (Asia Cup) 2022च्या हंगामात भारताने बुधवारी (31 ऑगस्ट) हॉंगकॉंगला 40 धावांनी पराभूत केले. आशिया चषकाच्या 15व्या हंगामात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली लयीत दिसत आहे. प्रथम त्याने पाकिस्तान विरुद्ध महत्वाची खेळी केली आणि आता हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे. त्याच्या या दोन मोठ्या खेळीवरून ‘कोहली इज बॅक’ असे म्हणायला काही हरकत नाही. त्याचा हा फॉर्म पाहून चाहते तर खूष झालेच आहेत तर त्याची पत्नीही आनंदीत झाली असून तिने खास पोस्ट शेयर केली आहे.
हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने 44 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. यावेळी त्याने एक चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. विराटचा फॉर्म परत आल्याने त्याची पत्नी-अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेयर केली आहे. यामध्ये तिने विराटच्या फोटोला हृद्याची इमोजी जोडली आहे.
विराटने केलेले अर्धशतक 2022च्या आशिया चषक हंगामातील पहिलेच अर्धशतक ठरले आहे. त्याने तब्बल सहा महिन्यानंतर आतंरराष्ट्रीय अर्धशतक केले आहे. याआधी त्याने वेस्ट इंडिजच्या विरुद्ध कोलकाता येथे 52 धावांची खेळी केली होती.
विराटने 2019 नंतर एकही शतक न केल्याने त्याच्यावर चोहोबाजूंनी टीका सुरू होती. तर चाहतेही निराश होते. मात्र त्याचा आशिया चषकातील फॉर्म पाहता पुन्हा एकदा चाहत्यांच्या आनंदाला उधान आले आहे.
आशिया चषकाच्या अ गटात असणाऱ्या भारताने हॉंगकॉंगला पराभूत करत लागोपाठ दुसरा विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 2 विकेट्स गमावत 192 धावा केल्या. होत्या. यामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने स्फोटक खेळी केली. त्याने 6 चौकार आणि 6 षटकार फटकारत 26 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना हॉंगकॉंगने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 152 धावा केल्या. या विजयाबरोबरच भारताने सुपर 4मध्ये प्रवेश केला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारच्या ‘360 डिग्री’ फलंदाजीच्या प्रेमात पडला कोहली, स्टेडियममध्ये खाली झुकून केला मुजरा
पाकिस्तानविरुद्धच्या मॅच विनर हार्दिकला हाँगकाँगविरुद्ध का केले संघाबाहेर? कारण समजले
मुझसे शादी करोगी? हाँगकाँगच्या क्रिकेटरने भर स्टेडियममध्ये प्रेयसीला केले प्रपोज, उत्तर मिळालं…