ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी (10 नोव्हेंबर) दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. भारत आणि इंग्लंड (INDvENG) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 बाद 168 धावा केल्या. विराट कोहली व हार्दिक पंड्या यांनी अर्धशतके पूर्ण करत भारतीय संघाला ही मजल मारून दिली. आपल्या अर्धशतकी खेळी दरम्यान विराटने अनेक विक्रमांना देखील गवसणी घातली.
संपूर्ण विश्वचषकात शानदार फॉर्ममध्ये असलेल्या विराटने या सामन्यातही आपला तो फॉर्म कायम राखला. केएल राहुल दुसऱ्याच षटकात बाद झाल्यानंतर त्याने मैदानावर पाऊल ठेवले. सुरुवातीला संथ फलंदाजी केल्यानंतर त्याने खराब चेंडूंचा समाचार घेत चौकार षटकार वसूल केले. त्याने बाद होण्यापूर्वी 40 चेंडूंवर 4 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. हे त्याचे या विश्वचषकातील चौथे अर्धशतक ठरले. यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 4000 धावांचा टप्पा पूर्ण केला.
विराट आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत ज्यावेळी कोणत्याही स्पर्धेच्या उपांत्य अथवा अंतिम सामन्यात खेळला आहे, त्या ठिकाणी त्याने शानदार कामगिरी केलीये. विराटने टी20 विश्वचषक, वनडे विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धांच्या उपांत्यत्व अंतिम सामन्यात खेळताना केवळ 12 डावांमध्ये 536 धावा केल्या आहेत. त्याने या क्रमवारीत श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे सोडले. संगकाराच्या नावे 16 डावात 531 धावा जमा आहेत.
या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग असून, त्याने 14 डावात 509 धावा केल्या होत्या. तर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली व श्रीलंकेचा माहेला जयवर्धने यांनी अनुक्रमे 489 व 484 धावा केल्या आहेत. (Virat Kohli Hits Most Runs In ICC Semifinals And Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात नुसता फ्लॉप ठरलाय केएल राहुल, कामगिरी पाहून तळपायाची आग जाईल मस्तकात
नाणेफेक इंग्लंडच्या नावे! उपांत्य सामन्यात टीम इंडिया करणार पहिली फलंदाजी; ‘असा’ आहे संघ