भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका सुरू व्हायला अवघे दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ४ ऑगस्टपासून या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ कसून घाम गाळताना दिसून येत आहे. कारण ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाची आहे. यापुर्वी इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे यावेळीही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने २०१६ मध्ये राहुल द्रविडचा विक्रम मोडत हा कारनामा केला होता. विराटने इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना एकाच कसोटी मालिकेत ६५५ धावा चोपल्या होत्या. ५ कसोटी सामन्यांच्या ८ डावात विराटने १०९.१६ च्या सरासरीने ६५५ धावा केल्या होत्या. ज्यामधे त्याने २ शतक झळकावले होते. याच मालिकेत त्याने आपल्या कसोटी मालिकेतील सर्वात मोठी (२३५ धावा) खेळी केली होती. इंग्लंड संघाविरुद्ध ही एका भारतीय फलंदाजाने केलेली सर्वात मोठी खेळी होती.(Virat Kohli holds the record for scoring the most runs in a test series against England)
विराटने ६५५ धावा करत राहुल द्रविड यांचा विक्रम मोडून काढला होता. २००२ मध्ये राहुल द्रविड यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ६०२ धावा केल्या होत्या. परंतु १४ वर्षानंतर विराटने हा विक्रम मोडीत काढत आपल्या नावावर केला होता. तसेच इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा फटकावण्याच्या विक्रमात तिसऱ्या क्रमांकावर देखील विराट कोहलीच आहे. त्याने २०१८ मध्ये ५९३ धावा केल्या होत्या.
इंग्लंड संघाविरुद्ध एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
विराट कोहली -६५५ धावा (२०१६)
राहुल द्रविड़ -६०२ धावा (२००२)
विराट कोहली-५९३ धावा (२०१८)
विजय मांजरेकर- ५८६ धावा (१९६१)
सुनील गावस्कर – ५४२ धावा (१९७९)
महत्त्वाच्या बातम्या-
सिंपल बट स्वीट!! विराट अन् अनुष्काच्या ‘त्या’ सिंपल लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष
भारतीय दिग्गजाने निवडला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ; चहल, कुलदीपला दिले नाही स्थान