---Advertisement---

IND vs NZ Final: फायनलपूर्वी भारताला मोठा झटका! दिग्गज विराट कोहलीला झाली दुखापत

---Advertisement---

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनल सामन्याची चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. (India vs New Zealand Final) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या फायनल सामन्याला आता फक्त काही तास उरले आहेत. दोन्ही संघ जेतेपदावर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज आहेत. तत्पूर्वी भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे.

खरेतर, भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) फायनल सामन्यापूर्वीच जखमी झाला. पाकिस्तानी मीडियाच्या अहवालानुसार, विराट कोहलीला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे हे सध्या स्पष्ट झालेले नाही. (Virat Kohli Injured)

पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या अहवालानुसार, विराट कोहली फलंदाजीचा सराव करत असताना, एक चेंडू त्याच्या घोट्याला लागला. दुखापतीनंतर कोहलीला वेदना जाणवत होत्या आणि त्याने ताबडतोब फलंदाजीचा सराव थांबवला. नंतर, वैद्यकीय पथकाने कोहलीच्या दुखापतीची तपासणी केली आणि त्याच्या घोट्यावर वेदनाशामक औषध फवारले आणि तेथे मलमपट्टी लावली.

रिपोर्ट्सनुसार, चांगली गोष्ट म्हणजे कोहलीची ही दुखापत फारशी गंभीर नाही. अशा परिस्थितीत, कोहली कोणत्याही परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध फायनल सामना खेळताना दिसेल. कोहली हा भारतीय फलंदाजीच्या पाठीचा कणा आहे. संघ व्यवस्थापनाला आशा असेल की तो फायनलमध्ये उत्तम खेळी करेल आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देईल.

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटने आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये 217 धावा केल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 72.33 आहे. कोहलीने पाकिस्तानविरुद्धही शानदार शतक झळकावले. याशिवाय, त्याने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 84 धावा केल्या ज्याने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (Virat Kohli Stats In Champions Trophy 2025)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल सामना उद्या (9 मार्च) दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला रोखण्यात यशस्वी होतो का? हे पाहणेदेखील उत्सुकतेचं ठरेल. (भारत विरूद्ध न्यूझीलंड, फायनल)

महत्त्वाच्या बातम्या-

भारत-न्यूझीलंड सामन्यात विराट कोहली करू शकतो रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी!
अंतिम सामन्यापूर्वी सौरव गांगुली टीम इंडियासाठी काय म्हणाले? जाणून घ्या
भारत-न्यूझीलंड सामन्याबद्दल माजी प्रशिक्षकाने केले मोठे वक्तव्य! ते नक्की काय हे जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---