---Advertisement---

बुमराह-शमीच्या गोलंदाजीची धार अन् विराट-रिषभचा प्रहार; सरावाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल

On: गुरूवार, जून 10, 2021 1:51 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. तसेच विलागिकरणाचा कालावधी संपल्यानंतर भारतीय संघाने सराव सत्राला प्रारंभ देखील केला आहे. कर्णधार विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सराव करत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर राशिद खानने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या कित्येक दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा सराव करण्यासाठी मैदानात उतरला आहे. विराट कोहली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सराव करत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून, “सूर्य निघाल्यामुळे आमच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे,.” असे लिहिले आहे.

या फोटोमध्ये विराट कोहलीसह चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल देखील आहेत. या फोटोवर अफगाणिस्तान संघाचा फिरकी गोलंदाज राशिद खानने जाळाच्या ईमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच अनेक चाहत्यांनी त्याला आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

याबरोबरच बीसीसीआयने सर्व खेळाडूंच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आपल्या भेदक गोलंदाजीला धार देण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहेत. तर अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंतही फलंदाजीचा कसून सराव करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CP5jyWpNY1K/?utm_medium=copy_link

भारतीय संघ सराव करण्यात व्यस्त आहे. तर न्यूझीलंड संघ इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता.तर दुसरा कसोटी सामना येत्या १० जून पासून सुरू होणार आहे. न्यूझीलंड संघाला या कसोटी सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन आणि फिरकीपटू मिचेल सेंटनर दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. परंतु असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी, केन विलियमसन ठीक होऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---