---Advertisement---

विराटने घेतली द्विशतकवीर मयंक अगरवालची रंजक मुलाखत; पहा व्हिडिओ…

---Advertisement---

इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला. या विजयात भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने(Mayank Agarwal)द्विशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.

मयंक अगरवालने (Mayank Agarwal) द्विशतकी खेळी करताना 243 धावा केल्या. त्यात 8 षटकार आणि 28 चौकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बीसीसीआय टीव्हीसाठी (BCCI TV) मयंकची मुलाखत घेतली.

यात विराटने मयंकसोबत त्याच्या खेळीची चर्चा केली. मयंकने तीन कसोटी सामन्यात दोन दुहेरी शतके ठोकली आहेत.

या मुलाखतीदरम्यान विराट म्हणाला, “आज माझ्याकडे आणखी एक दुहेरी शतक ठोकणारा खेळाडू आहे. मी मयंक अगरवालबद्दल बोलत आहे. मयंकने खूप लवकर दुहेरी शतक झळकावले. याबद्दल मयंक तूला काय वाटत आहे?”

“छान वाटत आहे. मी फलंदाजीला गेलो आणि दुहेरी शतक केले तेव्हा ते संघासाठी उपयुक्त ठरले याचा जास्त आनंद आहे. सलामीवीर म्हणून जेव्हा तूम्ही चांगली सुरुवात करता तेव्हा तुम्हाला आणखी समाधान मिळते आणि त्याचा संघाला फायदा होतो,” असे मयंक म्हणाला.

त्याचबरोबर पुढे मयंकने त्याच्या मानसिकतेबद्दलही चर्चा केली. “आम्ही सर्व अशा मनस्थितीतूनही जातो. जेव्हा आमच्याकडून धावा केल्या जात नाहीत. जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते तेव्हा आपण त्याचा आदर केला पाहिजे आणि जास्तीत जास्त धावा केल्या पाहिजेत. जिथून सामना गमावू शकत नाही अशा स्थितीत संघाला उभे केले पाहिजे,” असे विराटशी बोलताना मयंक म्हणाला.

त्यानंतर विराटने मयंकला फिटनेसबद्दलही विचारले. त्यावर “फिटनेस खूप महत्वाची आहे. जर आपण त्वरित तंदुरुस्त होत नसाल आणि थकल्यासारखे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. म्हणून फिटनेस फार महत्वाचे आहे. अजून काय सांगायचं?” असे मयंक म्हणाला.

त्याचबरोबर विराटने मयंकचे कौतुक करत त्याला मुलाखतीच्या शेवटी सांगितले की पुढच्या वेळी द्विशतक नाही त्रिशतक हवे आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---