क्रिकेटजगतात अनेक आजी-माजी दिग्गज खेळाडूंना आधुनिक क्रिकेटमधील खेळाडू आवडत असतात. यात आता पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांचाही समावेश आहे. त्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूचा खुलासा केला आहे.
मियाँदाद (Javed Miandad) यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जागतिक दर्जाचा खेळाडू असल्याचे सांगितले. त्यामुळेच विराट हा त्यांचा आवडता खेळाडू (Favourite Player) आहे. मियाँदाद यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण जगात विराटने चांगली कामगिरी केली आहे आणि हे त्याने केलेल्या कामगिरीच्या आकड्यांवरून स्पष्ट होते.
मियाँदाद यांनी आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवर सांगितले की, “मला विचारण्यात आले होते की, भारतीय संघात सर्वाधिक आवडता क्रिकेटपटू कोण आहे? यावेळी मी विराटची निवड केली आहे. मला याबाबतीत अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही. कारण त्याची कामगिरी याबाबतीत खूप काही स्पष्ट करते. लोकांना हे मान्य करावे लागेल आणि तसंही विराटची आकडेवारी सर्वजण पाहू शकतात.”
“विराटने दक्षिण आफ्रिकेत चांगली कामगिरी केली होती. इतकेच नव्हे तर त्याने यादरम्यान शतकी खेळी केली होती. वेगवान गोलंदाजांची विराटला भीती वाटते, उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर किंवा फिरकीपटूंविरुद्ध त्याला चांगली खेळी करता येत नाही, हे तुम्ही म्हणू शकत नाही,” असेही विराटबद्दल बोलताना मियाँदाद यावेळी म्हणाले.
मियाँदाद पुढे म्हणाले की, “तो एक क्लीन फटकेबाजी करणारा खेळाडू आहे. त्याचे शॉट्स पहा. त्याला फलंदाजी करताना पाहून खूप चांगले वाटते. त्याच्याकडे एक दर्जा आहे.”
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात (New Zealand vs India) विराटला चांगली कामगिरी करता आली नव्हती. या दौऱ्यात त्याने ११ डावांमध्ये एकून २१८ धावाच केल्या होत्या. यामध्ये १ अर्धशतकाचा समावेश होता.
क्रिकेटवरील ‘गोष्ट एका क्रिकेटरची’ लेखमालेतील अन्य लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालेतील काही खास लेख-
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर