भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सध्याच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये गणले जाते. 21 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात वेलिंग्टन येथे 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला (2 Matches of Test Series) सुरुवात होणार आहे. या सामन्यापुर्वी न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सने (Kane Williamson) विराटला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हटले आहे.
विलियम्सनने कसोटी सामन्यापुर्वीच्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, “विराट क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात उत्कृष्ठ कामगिरी करत आहे. तसेच भारताकडे उत्कृष्ठ खेळी करणारे, दर्जेदार फलंदाज आणि गोलंदाजही आहेत. यामुळेच भारतीय संघाने कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे केवळ विराटकडेच नाही तर संघातील बाकी खेळाडूंकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.”
आयसीसीच्या कसोटी आणि वनडे क्रमवारीत विराटने अव्वल स्थान पटकावले आहे. तर टी20 क्रिकेटमध्ये तो 10व्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच विराट आणि विलियम्सन एकमेकांना ओळखतात. ते 2008मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषकात (U-19 World Cup) आपापल्या संघाचे कर्णधार होते. तसेच त्या विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड संघात उपांत्य फेरीचा सामना झाला होता. यावेळी भारतीय संघाने हा सामना 3 विकेट्सने (Won By 3 Wickets) जिंकला होता. तसेच, दोघेही आयपीएलमध्ये (IPL) एकमेकांविरोधात खेळत असतात.
विलियम्सने विराटबरोबर घालवलेल्या क्षणांना उजाळा देत म्हटले आहे की, “मी आणि विराटने अनेक सामने एकमेंकाविरोधात खेळले आहेत. यात 19 वर्षांखालील विश्वचषक तसेच आयपीएल यांचा समावेश आहे. असे असतानाही विराटच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील कामगिरीमुळे मी त्याचे अनेकवेळा कौतुक केले आहे.”
न्यूझीलंडमध्ये आयोजित भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 2 सामन्यांची कसोटी मालिका ही कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचाच भाग आहे. सध्या भारतीय संघ 360 गुणांसह कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
उपकर्णधार अजिंक्य रहाणेने रिषभ पंतला दिला 'हा' सल्ला; म्हणाला…
वाचा- ????https://t.co/ZsRx3UiaGF????#म #मराठी #Cricket @ajinkyarahane88 @RishabhPant17— Maha Sports (@Maha_Sports) February 20, 2020
महिला टी२० वर्ल्डकप: पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत; जाणून घ्या स्पर्धेबद्दल सर्वकाही…
वाचा????https://t.co/oksECqQz80????#म #मराठी #Cricket #T20WorldCup #AUSWvINDW— Maha Sports (@Maha_Sports) February 20, 2020






