भारतीय संघाचे जवळपास सर्व खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आयपीएल २०२२ हंगामासाठी स्वतःच्या फ्रेंचायझीसोबत सहभागी झाले होते. परंतु भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीने काही दिवसांची विश्रांती घेतली होती. कसोटी मालिका जिंकल्यानंतर विराट काही दिवस कुटुंबासोबत होता आणि त्यानंतर आता आयपीएल फ्रेंचायझीसोबत जोडला गेला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाच्या कॅम्पमध्ये विराटचे आगमन झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. आरसीबीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून विराट संघासोबत जोडला गेल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, विराट कोहली (Virat Kohli) आगामी आयपीएल हंगामात आरसीबी संघाचे फक्त प्रतिनिधित्व करणार आहे. नेतृत्वाची जबाबदारी दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plesis) याच्यावर आहे.
https://twitter.com/RCBTweets/status/1505914487181742082?s=20&t=EeU-xRJOwVlqgSJ-omLw4w
विराटने २००८ साली भारतीय संघाला १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर आरसीबीने त्याला संघात सामील केले होते. त्यानंतर २०११ साली तो आरसीबीचा कर्णधार बनला. मागच्या हंगामापर्यंत आरसीबी संघ विराटच्याच नेतृत्वात खेळत होता. परंतु मागच्या हंगामादरम्यान विराटने कामाच्या तानामुळे आरसीबीचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने यूएईमध्ये आयपीएल स्पर्धा सुरू असताता घोषित केले होते की, त्याच्यासाठी कर्णधाराच्या रूपात आयपीएलचा हा चालू हंगाम शेवटचा असेल, आगामी हंगमापासून तो संघात खेळाडूच्या रूपाने सहभागी होईल.
मागच्या वर्षी सांगितल्याप्रमाणे विराट या हंगामात आरसीबीसाठी फलंदाजाच्या रूपात सहभागी झाला आहे. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जसाठी मागच्या हंगामात तुफानी फलंदाजी केलेल्या फाफ डू प्लेसिसला मेगा लिलावात आरसीबीने खरेदी केले आणि कर्णधाराची जबाबदारीही त्याच्यावर सोपवली आहे. डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबी त्यांच्या पहिला सामना २७ मार्चला पंजाब किंग्जविरुद्ध खेळेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संपूर्ण संघ –
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, फाफ डु प्लेसिस, वानिंदु हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेजलवुड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन एलन, शेरफेन रदरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चामा मिलिंद, अनीश्वर गौतम, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, लवनिथ सिसोदिया, डेविड विली.
महत्वाच्या बातम्या –
फाफ डू प्लेसिस सर्वात ‘स्वस्त’, तर ‘हा’ खेळाडू बनला आयपीएल १५मधील सर्वात महागडा कर्णधार, घ्या जाणून
महिला विश्वचषकात भारतासाठी ‘करा किंवा मरा’ सामना; बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय