---Advertisement---

किती गोड!! पॅव्हेलियनमध्ये परतताना विराटची वामिकासोबत मस्ती, व्हिडिओ व्हायरल

On: शुक्रवार, जानेवारी 14, 2022 4:48 PM
Virat Kohli
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम कसोटी सामन्याचा थरार केपटाऊनच्या (SA vs IND 3rd test) मैदानावर सुरू आहे. हा सामना सध्या रोमांचक स्थितीत आहे. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहली याला दुसऱ्या डावात मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या २९ धावा करत माघारी परतला. परंतु, तो आता एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या सामन्याच्या तिसऱ्या (१३ जानेवारी) दिवशी विराट कोहली आणि रिषभ पंत (Rishabh Pant) दोघांमध्ये महत्वपूर्ण भागीदारी झाली. त्यावेळी पहिले सत्र झाल्यानंतर जेव्हा दोन्ही खेळाडू पॅव्हेलियनच्या दिशेने जात होते. त्यावेळी विराट कोहली (Virat Kohli) मुलगी वामिका (Vamika) सोबत मस्ती करताना दिसून आला होता. वामिका विराट कोहलीच्या जवळ नव्हती तर ती स्टँड्समध्ये होती. या बाप – लेकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://twitter.com/imDL45/status/1481586080302264325

तिसऱ्या दिवसातील पहिले सत्र समाप्त झाले तोपर्यंत विराट कोहली आणि रिषभ पंत खेळपट्टीवर टिकून होते. त्यावेळी भारतीय संघाने केवळ ४ गडी गमावले होते. मजबूत स्थितीत असलेला भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारणार असे वाटले होते. परंतु, विराट कोहली स्वस्तात माघारी परतला. त्याला दुसऱ्या डावात अवघ्या २९ धावा करता आल्या.

https://twitter.com/_broken_user_/status/1481589241448898562

वामिकाबद्दल बोलायचं झालं, तर नुकतीच ती एक वर्षांची झाली आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसाचे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या होत्या. यासह दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी २१२ धावांचे आव्हान दिले आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला २ बाद १०१ धावा करण्यात यश आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

पहिल्याच मालिकेत विक्रमवीर ठरला प्रतिभावंत जेन्सन; रबाडाने केली कमाल

…आणि बुमराहला बाद करताच १४५ वर्षांत न झालेला पराक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावे झाला जमा; वाचा सविस्तर

 हे नक्की पाहा :

वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---