---Advertisement---

अशी प्रतिक्रिया देत विल्यम्सने घेतला विराटच्या नोटबूक सेलिब्रेशनचा बदला, पहा व्हिडिओ

On: सोमवार, डिसेंबर 9, 2019 7:56 PM
---Advertisement---

रविवारी (8 डिसेंबर) तिरुअनंतपुरम येथे भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात विंडीज संघाने भारताला पराभूत करत 8 विकेट्सने सामना जिंकला. तसेच मालिकेत 1-1 अशी बराबरी केली.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) विंडीजचा गोलंदाज केसरिक विल्यम्सने बाद केले.

कोहलीला बाद केल्यानंतर केसरिक विल्यम्सने (Kesrick Williams) त्याच्या तोंडावर बोट ठेवत शांत रहा अशा प्रकारचे सेलिब्रेशन करत विराटकडे पाहिले. अशाप्रकारे, केसरिक विल्यम्सने विराटच्या मागील सामन्यातील ‘नोटबूक सेलिब्रेशनचा’ बदला घेतला.

https://twitter.com/Abhi_patil18/status/1203693274931679232

यापूर्वी शुक्रवारी झालेल्या टी20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात विल्यम्सने गोलंदाजी केलेल्या 16 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराटने षटकार मारला. या षटकारानंतर विराटने त्याची बॅट पायाला टेववून ठेवली आणि वहीत नोंद करण्यासारखी (नोटबूक सेलिब्रेशन) कृती केली. विराटची ही कृती पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते.

पण शुक्रवारच्या सामन्यानंतर त्याच्या या सेलिब्रेशनमागील कारण सांगताना विराट म्हणाला की विल्यम्सने 2017 ला जेव्हा जमैकाला झालेल्या सामन्यात त्याला 39 धावांवर बाद केले होते, तेव्हा साधारण अशाच पद्धतीचे सेलिब्रेशन विल्यम्सने केले होते. त्या सेलिब्रेशनचे हे उत्तर होते.

त्यावेळी विराट असेही म्हणाला होता की ‘स्पर्धात्मक क्रिकेट खेळायचे आणि शेवटी हात मिळवून हाय-फाय द्यायचा. क्रिकेट हे एवढेच आहे. स्पर्धात्मक क्रिकेट खेळा पण तेवढाच प्रतिस्पर्ध्याचा आदर ठेवा.’

https://www.instagram.com/p/B5vQaqpAf6E/

मात्र, आता लगेचच रविवारी दुसऱ्या सामन्यात केसरिक विल्यम्सनेही विराटला बाद करून त्याचा बदला घेतला. तिरुअनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या टी20 सामन्यात केसरिक विल्यम्सने चौथ्या षटकातील दुसर्‍या चेंडूवर विराट कोहलीला 19 धावांवर बाद केले. विराटचा झेल लेंडल सिमन्सने (Lendl Simmons) घेतला.

https://twitter.com/ICC/status/1203700903490052097

https://twitter.com/Maha_Sports/status/1204008264544837632

https://twitter.com/Maha_Sports/status/1203959923748425729

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---