भारत आणि इंग्लंड संघादरम्यान चेन्नई येथे नुकताच मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत भारताचा पराभव केला. विशेष म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा हा सलग चौथा कसोटी पराभव आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौर्यात अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्व क्षमतेने भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. त्यामुळे विराट कोहलीऐवजी अजिंक्य रहाणेकडे भारताचे कसोटी कर्णधारपद देण्यात यावे अशी जोरदार मागणी होत आहे. विराटवर याबाबत दबाव वाढत असतानाच भारताचे माजी दिग्गज खेळाडू किरण मोरे यांनी मात्र त्याची पाठराखण केली आहे.
“कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल आत्ताच बोलणे घाईचे”
एका मुलाखतीदरम्यान मोरे म्हणाले, “विराट कोहली अव्वल खेळाडू आहे. तो सर्वोत्तम आहे. त्याच्या नेतृत्वाबद्दल चर्चा करणे सध्या तरी घाईचे ठरेल. विराटला त्याच्या इमानदारीबद्दल ओळखले जाते. तो जाणतो की केव्हा कर्णधारपद सोडायचे आहे. एमएस धोनीप्रमाणेच त्याला योग्य वेळ माहिती आहे.”
मोरे पुढे म्हणाले, “भारतीय संघाने यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये शानदार प्रदर्शन केले. पण विराटच्या नेतृत्वात देखील भारताने मालिका जिंकल्या आहेत. संघाने सर्व उर्जा पुढील सामना जिंकण्यासाठी वापरली पाहिजे. मला आशा आहे की भारत मालिकेत पुनरागमन करेल. ऑस्ट्रेलियाच्या प्रदीर्घ दौर्यानंतर भारतीय संघ आता या परिस्थितीत एक कसोटी सामना खेळला आहे. आता भारतीय गोलंदाज येथे चांगली गोलंदाजी करतील आणि फलंदाज जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चरविरुद्ध उत्तम कामगिरी करतील.”
दरम्यान सामन्याचा विचारला केला असता भारतीय संघाला 227 धावांनी मोठा पराभव सहन करावा लागला. इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारताचा पहिला डाव केवळ 337 धावांवर रोखला. आपल्या दुसऱ्या डावात इंग्लंडने 178 धावा केल्यानंतर भारताला 420 धावांचे आव्हान दिले. अखेरच्या दिवशी भारताचा संपूर्ण संघ केवळ 192 धावांवर गारद केला. त्यामुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर पडला आहे.
महत्वाच्या बातम्या:
नॅथन लायनला जर्सी भेट, मात्र रुटला काहीच नाही? इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विचारला प्रश्न
कसोटी क्रमवारी: जेम्स अँडरसनची तिसऱ्या स्थानी झेप; अश्विन, बुमराह या क्रमांकावर
आयसीसी कसोटी क्रमवारी : विराट कोहलीची या स्थानी घसरण, तर जो रूटची दोन स्थानांनी प्रगती