---Advertisement---

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात जाडेजावर भडकला विराट कोहली? म्हणाला, “श्वास तर घेऊ दे…

Virat Kohli
---Advertisement---

आयपीलच्या 17 व्या हंगामात CSK आणि RCB दम्यान IPL 2024 मधील सलामीचा सामना झाला आहे. तर त्या सामन्यादरम्यान असं काय झालं की, विराट कोहली रवींद्र जाडेजावर भडकल्याचे पहायला मिळालं आहे. तसेच हा संपूर्ण प्रकार इनिंगच्या 11 व्या ओव्हरमध्ये घडला आहे. तेव्हा विराट कोहलीसोबत कॅमरुन ग्रीन क्रीजवरती खेळत होते. तर याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. याबाबत आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत.

याबरोबरच RCB च्या इनिंगची 11 वी ओव्हर सुरु होती, त्यावेळी ही घटना घडली असुन त्यावेळी  विराट आणि ग्रीनची जोडी विकेटवर RCB साठी धावा बनवण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी गोलंदाजी करणाऱ्या रवींद्र जाडेजावर विराट कोहली भडकला आहे. तर  विराट कोहली रवींद्र जाडेजाला जे काही बोलला, ते असं आहे. अरे, त्याला श्वास तर घेऊ दे असं म्हणाला आहे. मात्र त्यानंतर विराट आणि जाडेजामध्ये हे बोलण झालं, त्यानंतरच्या ओव्हरमध्ये विराट आणि ग्रीन दोघेही क्रीजवर नव्हते. दोघेही त्यानंतरच्या 12 व्या ओव्हरमध्ये आऊट होऊन डगआऊटमध्ये गेले होते.

अशातच आयपीएल 2024 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 गडी गमवून 173 धावा केल्या आणि विजयासाटची 174 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने 18.4 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने स्पर्धेतील विजयी घोडदौड सुरु केली आहे. तर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात स्पर्धेतील पहिला विजय मिळवला आहे. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सच्या पारड्यात 2 गुणांची भर पडली आहे.

https://twitter.com/StumpSide07/status/1771392854327451672

दरम्यान, चेन्नईकडून डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमाननने प्रभावी मारा करत 4 षटकात 29 धावा घेत 4 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीत रचिन रविंद्रने 37 धावा केल्या तर शिवम दुबेने 34 धावा करत मॅच संपवली. रविंद्र जडेजाने 25 धावा करत दुबेला चांगली साथ दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---