पर्थ | वेस्टर्न क्रिकेट असोशियशन क्रिकेट स्टेडियम अर्थात वाका, पर्थ येथे उद्यापासून दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे. भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत विजय मिळवला असून ते १-०ने आघाडीवर आहे.
याच वाकावर आता कर्णधार विराट कोहलीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. या मैदानावर भारताकडून सर्वाधिक धावा करणारा कसोटीपटू होण्यासाठी विराटला केवळ १०७ धावांची गरज आहे.
भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने या मैदानावर ३ सामन्यातील ६ डावात फलंदाजी करताना ३७.६६च्या सरासरीने २२६ धावा केल्या आहेत तर विराटने २०१२मध्ये येथे एकच सामना खेळला आहे. ज्यात त्याने ५९.५०च्या सरासरीने ११९ धावा केल्या होत्या.
पाहुण्या संघातील खेळाडूंमध्ये या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डेविड गोव्हर यांच्या नावावर आहे. त्यांनी ६ सामन्यात ५२.३३च्या सरासरीने ४७१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या खेळाडूचा आयपीएलला बाय बाय
–टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारणही आहे तसचं काहीस वेगळं
–शास्त्रींना प्रशिक्षक पदाववर नेमण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा बीसीसीआयवर मोठा आरोप






