शनिवारी(3 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. तसेच तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने खास विश्वविक्रम केला आहे.
वेस्ट इंडीजने दिलेल्या 96 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने या सामन्यात 29 चेंडूत 19 धावा केल्या. या खेळीत त्याला केवळ 1 चौकार मारता आला. हा त्याचा आंतरराष्ट्रीय टी20 मधील 224 वा चौकार होता. त्यामुळे विराट आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला आहे.
त्याने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिल्शानच्या आंतरराष्ट्रीय टी20मधील 223 चौकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. शनिवारच्या सामन्याआधी विराट आणि दिल्शान या यादीत विभागून अव्वल क्रमांकावर होते. पण आता विराटने दिल्शानला मागे टाकले आहे.
या यादीत भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने शनिवारी झालेल्या सामन्यात 24 धावांची खेळी करताना 2 चौकार मारले. त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 209 चौकार झाले आहेत.
शनिवारी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजला 20 षटकात 9 बाद 95 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले होते. वेस्ट इंडीजकडून फक्त किरॉन पोलार्डने 49 धावांची चांगली झूंज दिली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. त्यानंतर 96 धावांचा पाठलाग भारतीय संघाने 6 विकेट्स गमावत 17.2 षटकात पूर्ण केला.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक चौकार मारणारे क्रिकेटपटू –
224 चौकार – विराट कोहली
223 चौकार – तिलकरत्ने दिल्शान
218 चौकार – मोहम्मद शेहजाद
209 चौकार – रोहित शर्मा
200 चौकार – मार्टिन गप्टिल
199 चौकार – ब्रेंडन मॅक्यूलम
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–४४ वर्षांपुर्वी २० युरोंसाठी तो मैदानात थेट नग्न अवस्थेत गेला
–केवळ १९ धावा करुनही विराट कोहलीने केला हा खास विक्रम, आता फक्त रोहित शर्मा आहे पुढे
–टी२०मध्ये असा पराक्रम करणारा नवदीप सैनी जगातील चौथाच गोलंदाज