भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर जेसे नेहमीच विविध विक्रम करत असतो. तसेच मैदानाबाहेरही त्याचे नाव कायम चर्चेत असते. नुकतेच फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणाऱ्या एथलिट्सची 2019 वर्षाची यादी जाहीर केली आहे.
या यादीत विराटने पहिल्या 100 जणांमध्ये स्थान मिळवले असून तो या यादीत 100 व्या क्रमांकावर आहे. तसेच पहिल्या 100 जणांमध्ये विराट हा एकमेव भारतीय आहे.
फोर्ब्सच्या यादीनुसार विराट मागीलवर्षी 166 कोटी रुपये कमाईसह या यादीत 83 व्या स्थानावर होता. पण 2019 मध्ये त्याच्या कमाईत 7 कोटी रुपयांची वाढ होऊन 173.3 कोटी रुपये झाली असली तरी तो यावर्षी या यादीत 100 व्या स्थानावर आला आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर अर्जेंटिना आणि बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आहे.
तसेच या यादीत मेस्सीच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो आहे. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार ज्यूनियर आहे.
फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक कमाई करणारे पहिले 100 एथलिट्स हे एकूण 25 देशांतील आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–शिखर धवनच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयचा मोठा खूलासा
–विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले…
–विश्वचषक २०१९: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का