नुकत्याच इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या ऍशेस मालिकेतून ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने 1 वर्षांच्या बंदीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले. त्याने या ऍशेस मालिकेत 7 डावात 110.57 च्या सरासरीने 774 धावा केल्या आहेत.
त्याच्या या यशस्वी पुनरागमनानंतर पुन्हा एकदा त्याच्या आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या तुलनेची चर्चा सुरु झाली आहे. अनेक दिग्गजांनी या दोघांबद्दल विविध मते मांडली आहेत. आता यात दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्सनेही त्याचे मत मांडले आहे. ऱ्होड्सने विराटची सर्वोत्तम फलंदाज म्हणून निवड केली आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ऱ्होड्स म्हणाला, ‘मला विराट कोहलीला पहायला आवडते. स्मिथ त्याच्या अनोख्या शैलीने फलंदाजी करतो आणि मी आत्तापर्यंत पाहिलेल्यांपैकी सर्वात वाईट शतके त्याने त्या शैलीने केली आहेत. पण तो धावा करत राहतो.’
‘ज्याला क्रिकेट पहायला आवडते तो स्मिथच्या एखाद्या फटक्यावर म्हणेल ‘मस्त शॉट मारला.’ पण मी त्याच्या विरुद्ध म्हणेल, ‘या पृथ्वीवर असा फटका हा कसा मारु शकतो?’ त्यामुळे सध्यातरी विराट कोहली.’
त्याचबरोबर सध्याचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण, यावर उत्तर देताना ऱ्होड्सने मार्टिन गप्टिलचे नाव घेतले. तसेच रविंद्र जडेजाला अजून पुरेसा वेळ मिळालेला नसल्याचे म्हटले आहे.
ऱ्होड्स म्हणाला, ‘जडेजाला अजून पुरेसा वेळ मिळालेला नाही. गप्टिलने प्रत्येक सामना खेळला आहे. गप्टील स्लीपमध्ये, कव्हर्सवर आणि बाऊंड्रीजवळही चांगले क्षेत्ररक्षण करतो. तो एक चांगला अष्टपैलू क्षेत्ररक्षक आहे. जडेजाकडे एक्स फॅक्टर आहे. तो एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. पण मी गप्टिलला पसंती देईल.’
तसेच ऱ्होड्सला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यातील एकाची निवड करण्यास सांगितल्यावर तो म्हणाला, परिस्थितीनुसार मला काय हवे आहे त्यानुसार मी निवड करेल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियाकडून २००३च्या विश्वचषकात खेळलेल्या या खेळाडूने घेतली निवृत्ती
–फिक्सिंग प्रकरणाबाबत कोहली-धोनीबद्दल एसीयू प्रमुखांनी केले मोठे भाष्य, म्हणाले…
–विराट कोहली-कागिसो रबाडाबद्दल क्विंटॉन डीकॉकने केले मोठे भाष्य