आशिया चषकात रनमशीन विराट कोहली याच्या प्रदर्शनावर सर्वांची नजर लागून असणार आहे. गेल्या ३ वर्षांत एकही आंतरराष्ट्रीय शतक न करू शकलेल्या विराटच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु काही दिग्गजांना विश्वास आहे की, तो आशिया चषक २०२२ मधून शानदार पुनरागमन करेल. अशात रविवारी (२८ ऑगस्ट) दुबई येथे होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटची अग्निपरिक्षा असेल. तत्पूर्वी विराट नेट्समध्ये कसून घाम गाळत या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी सज्ज होत आहे.
भारताला विक्रमी आठव्यांदा आशिया चषक जिंकून देण्यासाठी विराट सराव सत्रात भरपूर मेहनत घेत आहे. यादरम्यान विराटचा आणखी एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो दुबईच्या (Virat Kohli Practice On Dubai Road) रस्त्यावर फलंदाजी करताना दिसत आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघ ३-४ दिवसआधीच युएईला पोहोचला आहे. येथे दुबईच्या आयसीसी अकादमीत भारतीय खेळाडू सराव करत आहेत. विराट कोहलीही खराब फॉर्मातून पुनरागमन करण्यासाठी नेट्समध्ये कसून घाम गाळत आहे. तो सराव सत्रात फलंदाजीला येत कव्हर ड्राईव्ह आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटके मारताना दिसून आला. त्याला संघाचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा, प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग गोलंदाजी करताना दिसले.
विशेष म्हणजे, फक्त सराव सत्रातच नव्हे तर विराटने दुबईच्या रस्त्यांवरही फलंदाजी केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, विराट रेड कारपेटवर फलंदाजीची कृती करत आहे. तो हवेत बॅट फिरवताना दिसत आहे. कदाचित हा कोणत्या कार्यक्रमातील व्हिडिओ असावा.
https://twitter.com/hit_ahir_1718/status/1562322685165707265?s=20&t=Hew3eiHqep7q1yMsItbhuw
केव्हा, कोणाविरुद्ध खेळणार भारतीय संघ?
दरम्यान आशिया चषकातील भारतीय संघाचा पहिला सामना २८ ऑगस्टला दुबईत खेळला जाणार आहे. हा सामना पाकिस्तानविरुद्ध रंगेल. त्यानंतर ३१ ऑगस्टला हाँगकाँगविरुद्ध भारतीय संघ दोन हात करेल. हा सामनाही दुबईत होईल. त्यानंतर जर भारतीय संघ अ गटात टॉप-२ मध्ये राहिला तर सुपर-४ मध्येही प्रवेश करू शकतो.
शत्रू नव्हे प्रतिस्पर्धी! विराटच्या पुनरागमनासाठी आफ्रिदी करतोय प्रार्थना, व्हिडिओ जिंकेल मन
नवी जर्सी समोर आली रे..! एशिया कपसाठी अशी आहे भारताची जर्सी, लोगोवरील ३ स्टार्सचे खास महत्त्व