रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना काल चेन्नईच्या मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात बंगलोरच्या संघाने अप्रतिम सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करत कोलकताच्या संघाला धूळ चारली. पहिल्या डावात फलंदाजी करतांना बंगलोरने २०४ धावांचा डोंगर उभारला. आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या कोलकात्याला १६६ धावांवर रोखत ३८ धावांनी विजय मिळविला.
या विजयानंतर कर्णधार विराट कोहली भलताच खुश झाल्याचे दिसून आले. बंगलोरच्या संघातील सगळ्याच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी एका गोलंदाजाच्या कामगिरीने कोहली विशेष प्रभावित झाला होता. सामन्यांनंतर बोलतांना कोहलीने या गोलंदाजीचे भरभरून कौतुक केले.
“ऑस्ट्रेलिया दौर्यानंतर त्याच्यात आमूलाग्र बदल”
कोहली ज्या गोलंदाजामुळे प्रभावित झाला आहे, तो गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आहे. कोलकता विरूद्धच्या सामन्यात अखेरच्या २ षटकांत कोलकात्याला जिंकण्यासाठी ४४ धावांची गरज होती. त्यावेळी सिराजवर कर्णधार कोहलीने विश्वास दर्शवत महत्वाची अशी १९वी ओव्हर दिली. सिराजने देखील कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत या षटकांत आंद्रे रसेल सारखा स्फोटक फलंदाज समोर असूनही केवळ एक धाव दिली आणि बंगलोरचा विजय निश्चित केला. याच कामगिरीमुळे कोहलीने त्याचे भरभरून कौतुक केले.
कोहली म्हणाला, “रसेल विरूद्ध सिराजने अप्रतिम षटक टाकले. रसेल विरूद्ध यापूर्वी देखील त्याने चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यावरून आल्यानंतर तो एक वेगळाच गोलंदाज झाला आहे. त्याच्यात आमूलाग्र बदल झाला आहे. त्याने टाकलेल्या १९व्या षटकाने सामनाच संपवून टाकला.”
बंगलोरने यंदाच्या हंगामातील तीनही सामने जिंकले आहेत. याबाबत बोलतांना कोहली म्हणाला, “हर्षल पटेलच्या डोक्यात शेवटच्या ओव्हर्स मध्ये स्पष्टता असते. त्यामुळे तो उत्तम गोलंदाजी करू शकतो. याशिवाय कायले जेमिसनने देखील चांगली गोलंदाजी केली. याचमुळे आम्ही तीनही सामने जिंकले आहेत.”
महत्वाच्या बातम्या:
सहकार्यांना साथ देण्यासाठी वॉर्नर आणि विलियम्सनने पाळले रोजे, राशिद खान व्हिडिओ शेअर करत म्हणाला
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाला बापमाणसाकडून हिरवा कंदील, प्रतिक्रिया वाचून तुमचीही पटेल खात्री!
हे कोलकाताचे दुर्दैव आहे की त्यांच्याकडे असा खेळाडू आहे; इंग्लिश दिग्गजाने व्यक्त केली चिंता