विराट कोहली गेल्या एका दशकाहून अधिक काळ केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. दुर्दैवाने, 2024 हे वर्ष त्याच्यासाठी खूप वाईट ठरले. ज्यामुळे आता त्याच्यावर निवृत्तीचा दबाव वाढत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने फक्त 190 धावा केल्या. जे खूपच कमी होत्या. अशा परिस्थितीत बीसीसीआयने त्याच्या व्यतिरिक्त, इतर अनेक वरिष्ठ क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. पण विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळेल की नाही? हे अद्याप समोर आलेले नाही. पण या बातमीद्वारे जाणून घेऊयात रणजी ट्रॉफीमध्ये विराटची आकडेवारी कशी आहे.
विराट कोहली शेवटचा 2012 मध्ये घरगुती सामना खेळताना दिसला होता. त्याने 2006 मध्ये दिल्लीकडून स्थानिक स्तरावर पदार्पण केले. त्याने आतापर्यंत त्याच्या रणजी करिअरमध्ये 23 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 1574 धावा केल्या आहेत. ज्यात त्याने पाच शतके झळकावली आहेत आणि 50.77 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. आतापर्यंतच्या त्याच्या शेवटच्या रणजी सामन्यात, उत्तर प्रदेशविरुद्ध खेळताना, त्याने 13 आणि 43 धावांच्या डावांची खेळी केली. त्या सामन्यात दोन्ही वेळा कोहलीची विकेट घेणारा गोलंदाज भुवनेश्वर कुमार होता.
विराट कोहलीचा 2009/10 चा रणजी हंगाम धावा आणि सरासरीच्या बाबतीत सर्वोत्तम ठरला. त्या हंगामात कोहलीने फक्त 3 सामन्यात 374 धावा केल्या होत्या. त्या हंगामात त्याची सरासरी 93.5 होती. याशिवाय, 2007/09 आणि 2010/11 हंगामात त्याने 50 च्या प्रभावी सरासरीने धावा केल्या आणि दोन्ही वेळा हंगामात 300 पेक्षा जास्त धावा केल्या.
एकीकडे, रणजी ट्रॉफीमध्ये रिषभ पंत, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल सारख्या प्रसिद्ध खेळाडूंचे पुनरागमन जवळजवळ निश्चित दिसते. पण वृत्तानुसार, डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा यांच्या मते, विराट कोहलीबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा-
मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानात जाणार
हा खेळाडू बनणार होता टीम इंडियाचा ‘पोस्टर बॉय’, आता संघातही जागा मिळेना!
वयाच्या 45 व्या वर्षी या खेळाडूची रोनाल्डोच्या सेलिब्रेशनची कॉपी, पाहा VIDEO