---Advertisement---

सात धावांवर बाद होऊनही विराटची आणखी एका विक्रमाला गवसणी

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 3:56 PM
Virat-Kohli-Batting
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ बॅकफूटवर आला आहे. इंग्लिश गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजी पुढे भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांमध्ये गुंडाळला गेला. भारतीय कर्णधार विराट कोहली या सामन्यात देखील अपयशी ठरला. विराट अँडरसनच्या गोलंदाजीवर सात धावांवर बाद झाला. मात्र तरीही, विराटने एक नवा विक्रम आपल्या नावे केला.

विराटच्या १००० धावा पूर्ण
लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ ७८ धावांवर गडगडला. कर्णधार विराट कोहलीही ७ धावांर माघारी परतला. मात्र तरीदेखील त्याच्या नावे एक नवा विक्रम जमा झाला. विराट जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये १००० धावा बनविणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात चौथी धाव पूर्ण करताच त्याने हा पल्ला गाठला. त्याच्याआधी अजिंक्य राहणे व रोहित शर्मा यांनी अशी कामगिरी केली आहे. विराटचा नावे आता १८ सामन्यात १००३ धावा जमा झाल्या आहेत.

भारतीयात रोहित आघाडीवर
भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आत्तापर्यंत १५ कसोटीत १२६५ धावा काढल्या आहेत. तर, रहाणेने २१ कसोटीत १२४४ धावा बनविल्या आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रूट या यादीमध्ये अव्वलस्थानी आहे. त्याने आत्तापर्यंत २३ कसोटींच्या ४१ डावांमध्ये २०४६ धावा जमविल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन १६७५ धावांसह दुसऱ्या तर, स्टीव्ह स्मिथ १३४१ धावा करून तिसर्‍या क्रमांकावर विराजमान आहे.

पहिल्या दिवसावर इंग्लंडचे वर्चस्व
लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवसावर यजमान इंग्लंडने वर्चस्व गाजवले. जेम्स अँडरसन व क्रेग ओव्हरटन यांच्या प्रत्येकी तीन तर, सॅम करन व ओली रॉबिन्सन यांच्या प्रत्येकी दोन बळींच्या जोरावर इंग्लंडने भारताचा पहिला डाव ७८ धावांवर संपविला. त्यानंतर हसिब हमीद व रॉरी बर्न्स यांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाबाद १२० धावांची सलामी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहितमुळे इंग्लंडच्या ओपनरला जीवनदान, झेल टिपला असता तर वेगळी असती सामन्याची परिस्थिती!

भारताला स्वस्तात गुंडाळल्यानंतर अंडरसन म्हणाला, ‘आम्ही तेच केलं जे करायचं होतं’; वाचा पूर्ण भाष्य

https://mahasports.in/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%83%e0%a4%96%e0%a4%a6-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%b2-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d/

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---