इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत विराट कोहली याने सलग दोन शतके झळकावली. यामुळे त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 7 शतके नोंदवली गेली. अशाप्रकारे तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतके ठोकणारा पहिला खेळाडू बनला. यासह त्याने टीकाकारांवर निशाणा साधला. तो म्हणाला की, लोकांनी विचार केला की, तो टी20 फलंदाजाच्या रूपात चुकला आहे, पण यावेळी तो टी20 क्रिकेट प्रकारात त्याचे सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याने रविवारी (दि. 21 मे) रोजी गुजरात टायटन्स संघाविरुद्ध 61 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या होत्या. या खेळीनंतर तो म्हणाला की, “मला खूप चांगले वाटत आहे. अनेक लोक विचार करत होते की, माझा टी20 क्रिकेटचा स्तर घसरला आहे. मात्र, मी असा विचार करत नाही. माझा विश्वास आहे की, मी टी20 क्रिकेटमध्ये पुन्हा आपले सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे.”
विराट पुढे बोलताना म्हणाला की, “मी यावेळी प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटत आहे. मला अशाचप्रकारे टी20 क्रिकेट खेळायचे आहे. मी चेंडूला रिकाम्या ठिकाणी मारतो, खूप चौकार मारतो आणि परिस्थिती अनुकूल असेल, तर डावाच्या अखेरीस षटकारही मारतो.”
विशेष म्हणजे, या सामन्यात विराटने चांगलीच फलंदाजी केली, पण त्यावर शुबमन गिल (Shubman Gill) याने 52 चेंडूत केलेली नाबाद 104 धावांची खेळी भारी पडली. त्यामुळे आरसीबी संघ आयपीएलमधून बाहेर झाला आहे.
विराट कोहली याने आयपीएल 2023 स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्याने आरसीबीसाठी 14 सामने खेळताना 53.25च्या सरासरीने आणि 139.82च्या स्ट्राईक रेटने 639 धावा केल्या. विराटने या हंगामात सलग दोन शतके झळकावली. त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सविरुद्ध शतक ठोकले. याव्यतिरिक्त त्याने या हंगामात 6 अर्धशतकेही मारली. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फाफ डू प्लेसिस (730) आणि शुबमन गिल (680) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी आहे. (virat kohli reply critics said this know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता वेळ आलीये, विराटने RCB सोडून…’, पीटरसनचा कोहलीला ‘या’ संघाकडून खेळण्याचा सल्ला
सचिनकडून कौतुक होताच मॅचविनर गिलने शेअर केला शर्टलेस फोटो, 3 तासात पडला 1 मिलियन लाईक्सचा पाऊस