भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचा एक खास विक्रम आज मोडला जाण्याची शक्यता आहे. एखाद्या संघाविरुद्ध वनडेत वेगवान २ हजार धावा करण्याचा विक्रम सध्या रोहितच्या नावावर आहे.
हा विक्रम भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून मोडला जाण्याची शक्यता आहे. विराटने सध्या विंडीजविरुद्ध ३३ सामन्यांत विंडीजविरुद्ध ७०.८१च्या सरासरीने १९१२ धावा केल्या आहेत. यात ७०.८१च्या सरासरीने ७ शतके आणि १० अर्धशतके करत या धावा केल्या आहेत.
तर रोहित शर्माने ३७ सामन्यांत ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध जलद २००० हजार केल्या आहेत. सध्या हा विक्रम त्याच्याच नावावर आहे. तर या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर दुसऱ्या स्थानावर असून सचिनने ४० सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच जलद २००० हजार वनडे धावा केल्या आहे.
एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध जलद २ हजार वनडे धावा करणारे खेळाडू-
३७- रोहित शर्मा, ऑस्ट्रेलिया
४०- सचिन तेंडूलकर, ऑस्ट्रेलिया
४४- व्हिव्हियन रिचर्ड, ऑस्ट्रेलिया
४४- विराट कोहली, श्रीलंका
४५- एमएस धोनी, श्रीलंका
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या कारणामुळे ख्रिस गेल आजचा सामना कधीही विसरणार नाही…
–एका टी२० सामन्यात तब्बल ७ विकेट्स घेत या गोलंदाजाने रचला इतिहास, पहा व्हिडिओ
–अबब !! प्रो कबड्डीमधील तब्बल ११ मोठे विक्रम डुबकी किंग परदीप नरवालच्या नावावर