Virat Kohli Rejoines Team India: भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्मा याच्या खांद्यावर आहे. अशात महत्त्वाची बातमी समोर येत आहे की, भारताचा महान फलंदाज विराट कोहली सामन्यापूर्वी संघात सामील झाला आहे.
मालिकेपूर्वी संघात परतला विराट
विराट कोहली (Virat Kohli) 20 डिसेंबर रोजी प्रिटोरिया येथील सराव सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. अशात म्हटले जात होते की, विराट कौटुंबिक कारणांमुळे अचानक भारतात परतला आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघात पुनरागमन करेल. असेही म्हटले जात आहे की, बीसीसीआय (BCCI) आणि भारतीय संघ व्यस्थापनाला याविषयी आधीपासून माहिती होते की, विराट 20 ते 22 डिसेंबरपर्यंत संघासोबत नसेल.
आधीपासून होती संघ व्यवस्थापनाला माहिती
अशात बीसीसीआयच्या एका प्रमुख अधिकाऱ्याने सांगितले की, “विराट तो सामना खेळणार नव्हता. संघ व्यवस्थापनाला याविषयी आधीपासून माहिती होती. अशी कोणतीही गोष्ट नव्हती, जी एकदम कौटुंबिक कारणामुळे घडली असेल. अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या खेळाडूची चर्चा होत आहे, त्याचे नाव विराट कोहली आहे. अशा गोष्टीत तो खूपच स्पष्ट आहे. विराटने आपल्या लंडन यात्रेविषयी आधीच संघ व्यवस्थापनाला सांगितले होते आणि हे आधीपासून निश्चित झाले होते.
रोहित शर्माच्या नेतृत्वात कसोटी मालिका खेळणार भारतीय संघ
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी 24 डिसेंबर रोजी सकाळी सराव सामना खेळेल. तसेच, 25 डिसेंबरच्या दुपारी सराव सत्र होईल. यादरम्यान मोहम्मद शमी, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड उपस्थित नसतील. विशेष म्हणजे, केएस भरत आणि अभिमन्यू ईश्वरन यांना संघात जागा दिली आहे. भारत या मालिकेसोबत 31 वर्षांचा दुष्काळही संपवण्याचा प्रयत्न करेल. (virat kohli returned to team india ahead of 1st test against south africa)
हेही वाचा-
Captain vs Captian: एलिसा हिलीने अडवला चेंडू; हरमनप्रीतला राग अनावर, पण पंचांचा निर्णय मात्र…
हरमनसेनेचा भीमपराक्रम! वानखेडे कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचत घडवला इतिहास, स्मृतीचा विजयी चौकार