भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. सततच्या खराब प्रदर्शनामुळे चाहते विरटवर प्रश्न उपस्थित आहेत. परंतु दुसरीकडे अनेक माजी दिग्गजांकडून विराटला समर्थनही मिळत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटसरनने देखील एका इंस्टा पोस्टच्या माध्यमातून विराटला पाठबळ देण्याचे काम केले आहे. विराटची पत्नी अनुष्काने पीटसरच्या या पोस्टवर खास रिप्लाय दिला आहे.
केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून ही पोस्ट शेअर केला आहे. त्याने या पोस्टमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याला पाठिंबा देण्यासाठी स्वतःचे मत व्यक्त केले आहे. त्याने लिहिले आहे की, “मित्रा तुझी कारकीर्द अशी राहिली आहे की, सर्वश्रेष्ठ खेळाडूंनाही वाटत असेल, मी अशी कामगिरी करू शकलो असतो तर बरे झाले असते. तुला अभिमान वाटला पाहिजे आणि आयुष्याचा आनंद घे. तू लवकरच पुनरागमन करशील.”
पीटरसनने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरूनही विराटचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले आहे की, “त्याने क्रिकेटसाठी जे योगदान दिले आहे, लोक तसे फक्त स्वप्नच पाहू शकतात आणि तो सर्वत्तम खेळाडूंपैकी एक आहे.” पीटरसच्या या पोस्टवर विराटची अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने रिप्लायमध्ये हार्टची इमोजी पोस्ट केली आहे. पीटरसनच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, विराटच्या सध्याच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अवघ्या १६ धावा खर्च करून विकेट गमावली होती. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापतीच्या कारणास्तव विराटने माघार घेतली होती. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी (१७ जुलै) खेळला जाणार आहे. या सामन्यात विराटकडून चाहत्यांंना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
मागच्या अडीच वर्षांपेक्षा मोठ्या काळापासून विराट चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाहीये. त्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या डे नाईट कसोटी सामन्यात शेवटचे शतक केले होते. त्यानंतर मधल्या मोठ्या काळात विराटला एकही शतक करू शकला नाहीये. चाहते त्याच्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकाची आतुरतने वाट पाहत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पीव्ही सिंधूच्या शिरपेचात मानाचा तुरा! सिंगापूर ओपन २०२२मध्ये पटकावले विजेतेपद
विराटपेक्षा कमी वयाच्या बांगलादेशी कर्णधाराची T20I मधून निवृत्ती, निर्णयाने सर्वजण हैराण
बुमराहच्या विक्रमाला पडणार खिंडार? आफ्रिदीचा होणारा जावई पोहचलाय अगदी जवळ