भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यात सातत्याने तुलना होत असते, मात्र आता खुद्द विराट कोहलीने बाबर आझमबाबत मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहलीच्या म्हणण्यानुसार, तो 2019च्या वनडे वर्ल्ड कप दरम्यान बाबर आझमला पहिल्यांदा भेटला होता. यादरम्यान भारताचा माजी कर्णधार बाबर आझमला म्हणाला की, तू सध्याचा सर्वोत्तम फलंदाज आहेस. तसेच विराट कोहली म्हणाला की, बाबर आझम आणि माझे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत.
मी इमाद वसीम आणि बाबर आझम यांना त्यांच्या अंडर-19 दिवसांपासून ओळखतो: कोहली
विराट कोहली म्हणाला की, “एकदिवसीय विश्वचषक 2019 दरम्यान मी बाबर आझमला मँचेस्टरमध्ये भेटलो. मी इमाद वसीम आणि बाबर आझम यांना अंडर-19 च्या दिवसांपासून ओळखतो.पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम एक प्रतिभावान खेळाडू आहे. तो नेहमीच उत्कृष्ट क्रिकेट खेळत आला आहे. बाबर आझमचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. त्याचवेळी, बाबर आझम आपली चमकदार कामगिरी कायम ठेवेल आणि युवा खेळाडूंना प्रेरणा देत राहील, अशी आशा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.”
बाबर आझम उत्कृष्ट क्रिकेट खेळतोय – कोहली
नुकताच विराट कोहली आणि बाबर आझमचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये भारताचा माजी कर्णधार पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमसोबत बोलताना दिसत आहे. या फोटोनंतर विराट कोहली म्हणाला की, “बाबर आझम हा महान खेळाडू आहे आणि तो उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे. बाबर आझमला भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा.”
दरम्यान, आशिया कप 2022मध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ 28 ऑगस्ट रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाचे चाहते उत्सुक आहेत. मात्र, सामन्यापूरवी दोन्ही संघातील अनेक खेळाडू एकमेकांना भेटून हस्तांदोलन करताना दिसले. त्यावरून क्रिकेटमधील खेळभावनेचे दर्शन प्रत्येकाला घडले.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: रसेलने ठोकले 6 चेंडूत 6 सिक्स; केली युवी अन् पोलार्डच्या विक्रमाची बरोबरी
Asia Cup 2022: भारताविरुद्धच्या सामन्यात मेन इन ग्रीन घालणार काळा आर्मबॅंड, कारण कौतुकास्पद