भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटूंपैकी एक विराट कोहली सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. खराब फॉर्ममुळे त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सुट्टीवर असतानाही विराट क्रिकेटचाच विचार करत असून त्याने नुकतीच भारतासाठी आशिया चषक आणि टी२० विश्वचषक जिंकण्यासाठी काहीही करणार असल्याचे म्हटले आहे. विराट मागील ३ वर्षांमध्ये एकही शतक करू शकलेला नाही. मात्र त्याच्यातील गुणवत्ता आणि अनुभव पाहता त्याचे आयसीसीच्या या स्पर्धांमध्ये खेळणे निश्चित मानले जात आहे.
विराटने (Virat Kohli) इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेतून विश्रांती घेतली आहे. अगदी संघ निवडकर्त्यांनीही त्याच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. विराट आता झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसू शकतो. त्यानंतर तो थेट आशिया चषक २०२२ मध्ये दिसण्याची शक्यता आहे, जो ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये युएईत होणार आहे. तत्पूर्वी विराटने म्हटले आहे की, ही स्पर्धा जिंकण्यासाठी तो काहीही करू शकतो.
आशिया चषकाचे प्रसारणकर्ता स्टार स्पोर्ट्सशी बोलताना विराट म्हणाला की, “माझा मुख्य उद्देश्य (Virat Kohli Aim) भारताला आशिया चषक आणि विश्वचषक जिंकून देण्यात मदत करणे हा आहे. हे चषक जिंकण्यासाठी मी काहीही करण्यासाठी तयार आहे.”
दरम्यान आशिया चषक (Asia Cup) ऑगस्ट २०२२ ते सप्टेंबर २०२२ दरम्यान खेळला जाणार आहे. हा आशिया चषकाचा १५वा हंगाम असेल. भारतीय संघाने ७ वेळा आशिया चषकावर नाव कोरले आहे. तर टी२० विश्वचषक (T20 World Cup) १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान खेळला जाणार आहे. भारतीय संघाला आतापर्यंत फक्त एकदा टी२० विश्वचषक जिंकता आला आहे. २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा टी२० विश्वचषक जिंकला होता. अशात यंदा या दोन्हीपैकी एक चषक उंचावत भारतीय संघ ऐतिहासिक पराक्रम करू शकतो. या स्पर्धांमध्ये विराटच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात होणार मोठा बदल! ‘या’ स्टार खेळाडूला मिळणार पदार्पणाची संधी
मॅच विनिंग प्रदर्शनानंतर सिराजने सांगितला त्याचा शेवटच्या षटकातील प्लॅन, असा वाचवला सामना