भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक २०२२ साठी संयुक्त अरब अमिरातीला गेला आहे. २८ ऑगस्टपासून भारतीय संघाला त्यांच्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात करायची आहे. या स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली माजी कर्णधार एमएस धोनी याच्या आठवणीत भावूक झाला आहे.
विराटने (Virat Kohli) गुरुवारी (२५ ऑगस्ट) मध्यरात्री आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर धोनीसोबतचा (MS Dhoni) जुना फोटो शेअर केला (Virat Kohli आहे. या फोटोत विराट आणि धोनी भारतीय संघाच्या निळ्या जर्सीत दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘या माणसाचा (धोनी) विश्वसनीय प्रतिनिधी बनणे माझ्या कारकिर्दीतील सर्वात सुखद आणि रोमांचक काळ होता. आमच्यातील भागीदारी नेहमीच खास राहिले आहे. ७ + १८.’ असे लिहित विराटने पुढे हृदयाचा इमोजी जोडला आहे.
विराटच्या या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक केले जात आहे. ११ तासात या पोस्टला ३२ लाखांपेक्षा जास्त लाईक मिळाल्या आहेत.
https://www.instagram.com/p/ChsQb3wvmIk/?utm_source=ig_web_copy_link
विराटने २००८ साली धोनीच्या नेतृत्त्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारतीय संघाने त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात प्रशंसनीय प्रदर्शन केले होते. विराटच्या दैदिप्यमान कारकिर्दीत धोनीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. धोनीने भारतीय संघाचे नेतृत्त्वपद सोडल्यानंतर ही जबाबदारी आपला डेप्यूटी विराटवर सोपवली होती. पहिल्यांदा विराटला २०१४ मध्ये कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केले होते. त्यानंतर त्याला वनडे आणि टी२० संघाचा कर्णधारही बनवले गेले होते.
परंतु आता आशिया चषक २०२२ मध्ये विराट फक्त खेळाडू म्हणून सहभागी होणार आहे. विराटच्या नावावर आशिया चषकात १६ सामन्यात ७६६ धावा आहेत. ६३.८३ च्या प्रशंसनीय सरासरीने त्याने या धावा काढल्या आहेत. तसेच यात त्याच्या ३ शतके आणि २ अर्धशतकांचाही समावेश आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त नावाने नव्हे, मनानेही ‘किंग’! लाहोरवरून भेटायला आलेल्या पाकिस्तानी चाहत्याची कोहलीने पूर्ण केली इच्छा
चला भूर्रर्र! नेट्समधील धूमधडाक्यानंतर रोहितची लहान मुलांप्रमाणे मस्ती, सायकलवरून मारला फेरफटका
IND vs PAK | पराभवाआधीच रडले होते पाकिस्तानी खेळाडू, दिग्गजाने सांगितला जुना किस्सा