भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळायची असल्याने त्याची तयारी खेळाडू करत आहे. याच दरम्यान रविवारी विराट कोहलीने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही दिसत आहे. या दोघांचा हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
पोस्ट केलेल्या या फोटोची विशेष गोष्ट म्हणजे दोघेही साध्या लूकमध्ये दिसून येत आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लोकप्रिय सेलिब्रेटी जोडप्यांपैकी एक आहेत. चाहते नेहमी त्यांच्या फोटो आणि व्हिडीओची वाट पाहत असतात. विराटने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा फोटो पोस्ट केला होता.
या सुंदर फोटोमध्ये दिसते की विराट आणि अनुष्का दोघेही एकत्र बसले आहेत आणि टेबलवर काही खाद्यपदार्थ देखील ठेवलेले आहेत. या फोटोत विराट आणि अनुष्का दोघेही अगदी साध्या लूकमध्ये दिसून येत आहेत.
अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत इंग्लंड दौऱ्यावर गेली आहे. अलीकडेच तिने आपल्या मुलीसोबतचे फोटोही शेअर केला होते. तेव्हा वामिका ६ महिन्याची झाली होती. विराट आणि अनुष्कानी २०१७ मध्ये लग्न केले आणि यावर्षाच्या सुरुवातीला त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ज्याचा पहिला सामना ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही मालिका दोन्ही संघासाठी खूप महत्वाची आहे, कारण या मालिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला (२०२१-२३) सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“द हंड्रेड क्रिकेट स्पर्धा निरुपयोगी”, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केली बोचरी टीका
“बेन स्टोक्स एका संघात दोन खेळाडूंसारखा, त्याची अनुपस्थितीत भारताला फायद्याचीच”