---Advertisement---

“….तर विराट कोहलीने कर्णधारपद सोडावे”, मॉंटी पानेसरचे स्पष्ट मत

On: गुरूवार, फेब्रुवारी 11, 2021 12:02 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाचा दारुण पराभव केला होता. इंग्लंड संघाने भारतीय संघासमोर ४२० धावांचे आव्हान ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांना अवघ्या १९२ इतक्याच धावा करता आल्या.

या पराभवानंतर भारतीय संघावर आणि कर्णधार विराट कोहलीवर प्रश्नांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. अशातच पूर्व इंग्लिश क्रिकेटपटूने विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली आहे. विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी सामने, ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध १ तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना गमावला आहे. या लागोपाठ चार पराभवांमुळे कोहलीला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

“विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा”

एका मुलाखतीत मॉंटी पानेसर यांनी म्हंटले की, “विराट कोहली एक महान फलंदाज आहे. परंतु त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली नाही आहे. सलग चार सामने गमावल्यानंतर मला असे वाटते की, तो दबावात आहे. आणखी एक सामना गमावला तर विराट कोहली कर्णधारपद सोडू शकतो.”

विराट कोहलीच्या नेतृत्वात सलग ४ पराभव

जानेवारी २०२० मध्ये भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारतीय संघाला २ कसोटी सामने गमवावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला पिंक बॉल कसोटी सामना गमावला होता. त्यांनतर विराट कोहली पितृत्व रजा घेत माघारी परतला होता. आता नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाला पराजयाचा सामना करावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या:

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत पुनरागमन करेल

विजय हजारे ट्रॉफी २०२१ : या दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात, ६ शहरात खेळणार ३८ संघ

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार बदल? हा खेळाडू करू शकतो कसोटी पदार्पण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---