भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) संघात ईडन गार्डन स्टेडियमवर टी२० मालिकेतील दुसरा टी२० सामना (Second T20I) पार पडला. ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकल्याने त्यांना हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याची संधी होती. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसला. या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने शानदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकानंतर त्याने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
विराटचे दमदार अर्धशतक
पहिल्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरला. रोहित शर्मा व ईशान किशन भारतीय संघाला अपेक्षा सुरुवात देऊ शकले नाहीत. त्याचवेळी, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अनुभव विराट कोहलीने अत्यंत जबाबदारीने खेळ करत अर्धशतक झळकावून संघाला मोठ्या धावसंख्येची पायाभरणी करून दिली.
विराटने अगदी पहिल्या चेंडूपासून सकारात्मकरीत्या खेळत ४१ चेंडूवर १२६ च्या स्ट्राईक रेटने ५२ धावा केल्या यामध्ये ७ चौकार व एका षटकाराचा समावेश होता. वेस्ट इंडीजचा अष्टपैलू रोस्टन चेसने त्याला त्रिफळाचीत करत तंबूत धाडले.
काय म्हणाला विराट
भारतीय संघाच्या डावानंतर विराटने आपल्या अर्धशतकावर प्रतिक्रिया दिली. विराट म्हणाला,
“आज ज्या प्रकारचा खेळ मी केला त्यासाठी मी आनंदी आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून जबाबदारीने खेळत असता त्यावेळी तुम्हाला स्वतःला या गोष्टीची आठवण करून द्यायची असते. तुम्ही थोड्याशा यशाने समाधानी होऊ शकत नाही. मात्र, तुम्हाला तुमचे फटके खेळणे आवश्यक असते.”
🗣️🗣️Important to back yourself & trust your abilities @imVkohli talks about his mindset after his half-century.#TeamIndia | #INDvWI | @Paytm pic.twitter.com/PfIqS7vofM
— BCCI (@BCCI) February 18, 2022
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १८६ धावा केल्या. रिषभ पंत व विराट कोहली यांनी भारतीय संघासाठी अर्धशतके ठोकली. वेस्ट इंडीजसाठी रोस्टन चेसने सर्वाधिक ३ बळी मिळवले.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून लाडक्या मुलाला क्रिकेट खेळताना पाहायला जात नाही सचिन, कारण आहे कौतुकास्पद (mahasports.in)