भारताप्रमाणेच सध्या न्यूझीलंडमध्येही कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे तेथील सर्वच लोकांकडे आपापल्या घरात राहण्याशिवाय पर्याय नाही. यामध्ये क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. असे असले तरीही ते आपला एकटेपणा दूर करण्यासाठी सोशल मीडियामार्फत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत.
अशामध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तो कॉफीवर डिझाईन बनवताना दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “६ आठवड्यांच्या लॉकडाऊनदरम्यान मी हे शिकून घेतले आहे. जर कोणाला सल्ला द्यायचा असेल तर त्याचे स्वागत आहे. जर कोणाला आपल्या कॉफी हाऊसमध्ये वॉलंटियरची (स्वयंसेवक) आवश्यकता असेल, तर ते मला बोलवू शकतात.”
यावर ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) कमेंट करत विलियम्सनला कॉफीवर डिझाईन बनविण्याचा सल्ला दिला. त्याने लिहिले की, “जेव्हा तू ते दुध फिरवत असतो, त्यावेळी तुला कपावरून टाकायचे असते. त्यामुळे ते एका बारीक रेषेप्रणाणे बनते तसेच दूध कॉफीच्या आत जात नाही.
https://www.instagram.com/p/CABauujnq6t/
याव्यतिरिक्त भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) या पोस्टवर कमेंट केली आहे. तो म्हणाला की, “मस्त, परंतु ते तुझ्या बॅकफूट पंचइतके मोहक नाही.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-बरोबर वर्षांपुर्वी सीएसकेला धुळ चारत मुंबई इंडियन्स ठरली होती आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम
-एआर रेहमानच्या गाण्यावर थिरकला केपी, थेट रेहमाननेच केला व्हिडीओ शेअर
-कसोटीत ठरले जगातील ५ महान खेळाडू, पण वनडे करियर संपलं अचानक