---Advertisement---

…आणि कर्णधार विराट कोहली भर पत्रकार परिषदेत गाणं म्हणू लागला

On: मंगळवार, मार्च 23, 2021 10:55 AM
---Advertisement---

अहमदाबाद येथे पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेत भारताचा आक्रमक सलामीवीर केएल राहुल साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर चोहोबाजूंनी टीका केली जात आहे. भारताने ही मालिका ३-२ ने जिंकली असली, तरीही राहुलचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे.

राहुलने खेळलेल्या ४ टी -२० सामन्यात अवघ्या १५ धावा केल्या होत्या. असे असतानाही, पुन्हा एकदा कर्णधार विराट कोहलीने राहुलला समर्थन देत त्याच्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेतील पहिल्या ४ सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केएल राहुलला सलामी फलंदाजी करण्याची संधी दिली होती. तो या चारही सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही. अशातच दिग्गज खेळाडूंकडून त्याच्या फलंदाजीवर टीका केली जात आहे. टी -२० मालिका सुरू असताना कर्णधार विराट कोहलीने केएल राहुलचे समर्थन करत, राहुल संघासाठी महत्वाचा खेळाडू असल्याचे म्हटले होते.

आता पुन्हा एकदा विराटने राहुलला समर्थन देत त्याच्यावर टीका करणाऱ्यांना फिल्मी स्टाइलमध्ये उत्त्तर दिले आहे. त्याने राजेश खन्ना यांच्या ‘अमर प्रेम’ चित्रपटातील एक गाणे गात म्हटले की, “जेव्हा लोक खेळाडूच्या निराशाजनक कामगिरीबद्दल चर्चा करतात तेव्हा मला एकच गोष्ट आठवते. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना; छोड़ो, बेकार की बांतो में कहीं बीत ना जाए रैना.

“मला असे वाटते की, क्रिकेटच्या बाहेरील लोकांमध्ये जरासा पण धीर नाहीये. लोकांना नेहमी खेळाडूंना अपयशी होताना पाहायचे आहे. कुठला खेळाडू खाली जात असेल तर त्याला अजून खाली घालण्यात लोकांना जास्त मजा येते. परंतु एक संघ म्हणून आम्हाला माहीत आहे की, त्या लोकांना कसं सांभाळून घ्यायचं. आम्ही खेळाडूला सहकार्य करतच राहू.” असे पुढे विराट म्हणाला.

केएल राहुलची टी२०तील कामगिरी

केएल राहुलने भारतीय संघासाठी एकूण ४८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने १४२.२ च्या स्ट्राईक रेट आणि ४०.६ च्या सरासरीने तब्बल १५५७ धावा केल्या आहेत. यात त्याने २ शतक आणि १२ अर्धशतक झळकावले आहेत. अर्थात त्याने १४ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच आयसीसीच्या टी-२० रँकिंगमध्ये तो ७७१ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एकाची फलंदाजी तर दुसऱ्याची गोलंदाजी, पुणे वनडेत ‘हे’ दोन शिलेदार इंग्लंडसाठी कर्दनकाळ

“सूर्यकुमार यादवला वनडेत संधी देण्यासाठी वाटेल ते करण्यास तयार”

आज पुण्यात रंगणार भारत-इंग्लंड वनडेचा थरार; रोहित, विराटसह ‘हे’ खेळाडू घालणार विक्रमांचा रतीब

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---