भारत हा क्रिकेटवेड्या लोकांचा देश आहे. इथे क्रिकेटरसिकांना क्रिकेटपटूंच्या मैदानातील कामगिरीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबद्दलही जाणून घेण्याची उत्सुकता असते. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याचा चाहतावर्ग तर फार मोठा आहे. त्याच्या आवडीनिवडींपासून चाहत्यांना त्याच्याबद्दलच्या बारीकसारीक गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटतात. हाच विराट त्याच्या इतर संघ सहकाऱ्यांप्रमाणे सुट्टीवर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी (India Tour Of South Africa) तो आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसतो आहे.
नुकताच तो मुंबईत (Mumbai) आपल्या लग्जरी कारने (Virat Kohli’s Luxury Car) फिरताना दिसला आहे. त्याचा हा कारमध्ये फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे.
विराटला लग्जरी कार्सची खूप आवड आहे. त्याच्याजवळ असलेल्या कार कलेक्शनवरुन ही गोष्ट स्पष्टपणे जाणवते. त्याच्याकडे जवळपास ६ महागड्या लग्जरी कार आहेत. शनिवारी (११ डिसेंबर) तो अशाच एका लग्जरी कारमधून फिरताना दिसला आहे. वायरल भयानी नामक इंस्टग्राम वापरकर्त्याने त्याचा कारमधून जात असताना व्हिडिओ शेअर केल्यानंतर सर्वांचे त्याकडे लक्ष वेधले गेले आहे.
या व्हिडिओत विराट ऑडीच्या सर्वात पावरफुल इलेक्ट्रिक कार, ऑडी ई-ट्रॉन जीटी (Audi-e-tron-gt) ची सवारी करताना दिसतो आहे. त्याची ही लाल रंगाची आकर्षक कार जर्मनच्या कार ब्रँड, ऑडीशी जोडलेली आहे. तो या ब्रँडचा ब्रँड ऍम्बेसेडर आहे. यावर्षी जेव्हा ऑडीने भारतात ई ट्रॉन आणि आरएस ई ट्रॉन जीटी या कार लॉन्च केल्या होत्या, त्यावेळी त्या कार्यक्रमात विराटही उपस्थित होता. त्याच्या या ई ट्रॉन जीटी इलेक्ट्रिक कारची किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे.
https://www.instagram.com/reel/CXTmnDDqT2P/?utm_source=ig_web_button_share_sheet
विराटच्या इलेक्ट्रिक कारची विशेषता
विराटची इलेक्ट्रिक कार ० ते १०० चा वेग अवघ्या ४.१ सेकंदात मिळवू शकते. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर सहजपणे ५०० किलोमीटरचा प्रवास करू शकते. या कारचा सर्वाधिक वेग २४५ किमी दर ताशी इतका आहे. यामध्ये लावण्यात आलेली बॅटरिही फक्त २२ मिनिटात ५ ते ८० टक्केपर्यंत चार्ज होते. या कारच्या पावरविषयी बोलायचे झाल्यास, एंट्री लेव्हलवर या कारची पावर Audi e-tron GT quattro 469bhp असते आणि ही कार 630Nm का टॉर्क जनरेट करण्यासही सक्षम आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या ऑलिम्पिक प्रवेशाला ग्रहण! काय घडले? वाचा सविस्तर
अर्रर्र! क्रिकेट इतिहासातील अशा ४ बॅट, ज्यामुळे झाले खूपच मोठे वाद
हॅपी बर्थडे युवी: युवराज सिंगच्या एखाद्या युवराजासारखा झालेल्या कारकिर्दीचा लेखाजोखा!