भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाअंतर्गत ही कसोटी मालिका खेळवली जात असल्याने दोन्ही संघांच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच भारताला अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका न जिंकता आल्याने यावेळी इतिहास घडवण्यावरही पाहुण्या संघाचे लक्ष असणार आहे.
दरम्यान ही कसोटी मालिका खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या दिग्गज भारतीय कसोटीपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्यासाठी शेवटची संधी असल्याचे म्हटले जात आहे. परंतु या दोन्ही फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आतापर्यंतच्या दोन्ही कसोटीत संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केल्या आहेत. आता याच खेळाडूंबद्दल कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli) याने महत्त्वूपर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
११ ते १५ जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा (Third Test) सामना होणार आहे. हा सामना जिंकत मालिकाही खिशात घालण्याकडे दोन्ही संघांची नजर असणार आहे. या महत्त्वपूर्ण लढतीपूर्वी भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराटने सोमवारी (१० जानेवारी) पत्रकार परिषद (Virat Kohli In Press Conference) केली आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान तो बोलत होता.
व्हिडिओ पाहा-
पुजारा-रहाणेच्या प्रश्नावर कोहलीचे उत्तर
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या कामगिरी आणि फार्मबद्दल सध्या प्रश्न उपस्थित होत आहे. केपटाऊन कसोटीच्या अनुषंगाने याबद्दल विराटला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता, त्याने यावर स्पष्ट उत्तर दिले. (Virat Kohli On Rahane And Pujara)
‘रहाणे आणि पुजारा यांच्या अनुभवाचे मोल करता येणार नाही. ते अतिशय खडतर परिस्थितीत समोर आले आहेत. त्यांच्या अनुभवाचे प्रदर्शन आपण मागील वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेवटच्या कसोटीत पाहिले आहे.’ असे विराट म्हणाला.
तसेच सदर खेळाडूंच्या संक्रमणाच्या प्रश्नावर, कुणावरही बदल थोपावता येणार नाही. ही वैयक्तिक आणि परिस्थितीनुसार होणारी गोष्ट असेल.’ असेही विराटने म्हटले.
जोहान्सबर्ग कसोटीत रहाणे-पुजाराची संघासाठी महत्त्वाची भागिदारी
यापूर्वी जोहान्सबर्ग येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुजारा आणि रहाणेने संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या दुसऱ्या डावात केवळ त्या दोघांनीच अर्धशतकी धावा करता आल्या होत्या. या डावात पुजाराने ५३ आणि रहाणेने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली होती. तसेच दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १११ धावांची भागिदारीही झाली होती. अशाप्रकारे या सामन्यात अर्धशतकी धावा करत त्यांनी टिकाकारांना एकप्रकारे प्रत्युत्तर दिले होते. आता तिसऱ्या आणि महत्त्वपूर्ण सामन्यातही अशीच खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यावर त्यांचा भर असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मयंकला मागे टाकत ‘विश्वविक्रमी’ एजाज पटेलने पटकावला आयसीसीचा मानाचा पुरस्कार
विजयी भव! केपटाऊन कसोटीत कर्णधार विराटची बॅट ओकणार आग, विजयासाठी टीम इंडियाची तयारी सुरू
हेही पाहा-