भारतीय क्रिकेट संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातही त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आलेले नाही. तो आतापर्यंत चालू हंगामात ३ वेळा आपले खाते खोलू शकलेला नाही. तो तिनही वेळा गोल्डन डक (पहिल्याच चेंडूवर विकेट) झाला आहे. यानंतर आता पहिल्यांदाच विराट त्याच्या गोल्डन डकविषयी खुलेपणाने बोलला आहे. तसेच गोल्डन डक झाल्यानंतरही तो का हसला होता, याचे उत्तरही त्याने दिले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी, RCB) अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या मुलाखतीत विराट (Virat Kohli) बोलत होता. तो म्हणाला की, “२ गोल्डन डकनंतर (Golden Duck) मला खूप असहाय वाटत होते. माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत माझ्यासोबत असे यापूर्वी कधीही झाले नव्हते. कदाचित हेच कारण होते की, माझ्या चेहऱ्यावर हास्य खुलले होते. मला असे वाटते की, माझ्या दीर्घ क्रिकेट कारकिर्दीत आता सर्वकाही पाहिले आहे. हा खेळ मला जे काही दाखवू शकतो, ते सर्वकाही मी पाहिले आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच विराटला त्याच्या खराब फॉर्मबद्दल विचारले गेले व तो कशाप्रकारे टिकाकारांच्या टिकांना स्वत:वर हावी होऊ देत नाही. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “लोक माझ्या चपलांमध्ये पाय नाही घालू शकत. किंवा मला जे जाणवते, ते त्यांना जाणवत नाही.”
बाहेरच्या जगापासून स्वत:ला वेगळे ठेवण्याच्या प्रश्नावर बोलताना विराट म्हणाला, “बाहेरच्या जगापासून स्वत:ला वेगळे ठेवण्यासाठी एक तर मी टीव्हीचा पूर्ण आवाज बंद करतो. किंवा लोक माझ्याबद्दल जे काही बोलतात, त्यावर मी लक्ष देत नाही. मी या दोन्हीही गोष्टी करतो.”
https://www.instagram.com/tv/CdZxaKwDFEK/?utm_source=ig_web_copy_link
चालू हंगामातील खराब फॉर्ममुळे विराटला भरपूर टिकेचा सामना करावा लागला आहे. विराटने या हंगामात १२ सामने खेळताना केवळ २१६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजी सरासरी फक्त १९.६४ इतकी राहिली आहे. तसेच त्याला १२ सामन्यांमध्ये फक्त एक वेळा अर्धशतक करता आले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा सचिनच्या चेंडूवर धोनीने लाराला केलेले यष्टीचीत, मास्टर-ब्लास्टर म्हणालेला ‘बोला था ना मैंने’
‘काहीतरी मोठे होणार आहे’, रोहित शर्माबद्दल भारताच्या दिग्गज अष्टपैलूची खास भविष्यवाणी