---Advertisement---

इशान किशनला का मिळाली नाही चौथ्या टी२०त संधी? कॅप्टन कोहलीने सांगितले कारण

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 1:06 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला ८ धावांनी धूळ चारली. हा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. या महत्वाच्या सामन्यात, कर्णधार विराट कोहलीने धाडसी निर्णय घेतले होते. दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या इशान किशन आणि फिरकीपटू युजवेंद्र चहलला, या सामन्यात संघाबाहेर ठेवण्यात आले होते. आता कोहलीने इशानला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण सांगितले आहे.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार कोहलीने, इशानला पदार्पण करण्याची संधी दिली होती. या सामन्यात त्याने ५६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याला कोहलीने आपल्या स्थानी फलंदाजीला पाठवले होते. परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पुढे चौथ्या सामन्यात त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली होती.

इशानला संघाबाहेर ठेवण्याबाबत कोहली म्हणाला, “इशानला ग्रोईनच्या दुखापतीमुळे त्रास होत होता. मागच्या सामन्यात त्याने फाइन लेगच्या दिशेने डाइव केले होते याचा त्याला त्रास होत आहे. त्यामुळे त्याच्याजागी सूर्यकुमार यादवला चौथ्या टी२० सामन्यात खेळवण्यात आले.”

असे असले तरीही, पाचव्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात इशानला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. चौथ्या टी२० सामन्यातील विजयानंतर मालिका २-२ ने बरोबरीत आहे. त्यामुळे २० मार्च रोजी होणारा पाचवा सामना होणार निर्णायक ठरणार आहे. या सामन्याद्वारे टी२० मालिकेचा विजेता ठरेल. अशात संघाला भक्कम सुरुवात मिळण्यासाठी इशानला संधी दिली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

कर्नाटकच्या युवा गोलंदाजाचं चमकलं नशीब, इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्णासाठी सज्ज; ‘अशी’ राहिली कमागिरी

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणारा भारतीय खेळाडू परतला, पाचव्या टी२० सामन्यात मिळणार संधी?

तपश्चर्या आली फळाला! टी२० नंतर सूर्यकुमारची वनडेत दिमाखात एन्ट्री, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---