भारतीय संघाने दक्षिण अफ्रिका दौऱ्याची (india tour of south africa) सुरुवात विजयासह केली आहे. दौऱ्यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) दिवशी सुरू झाला होता आणि सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताने यामध्ये विजय मिळवला. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (virat kohli) याने या सामन्यात विजय मिळवून अनेक नवीन विक्रमांची नोंद केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने जिंकलेला हा दुसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना ठरला आहे.
विराट कोहली भारतीय संघाचाच नाही, तर आशिया खंडातील पहिला कर्णधार ठरला आहे, ज्यांने स्वतःच्या संघाला दोन बॉक्सिंग डे कसोटी सामने जिंकवून दिले आहेत. कसोटी संघाचे नेतृत्व करताना विराटने २०१८ मध्ये पहिला बॉक्सिंग डे सामना जिंकला होता. तर आता त्याच्या नेतृत्वात भारताने दुसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना २०२१ मध्ये जिंकला आहे.
भारतीय संघाने खेळलेल्या मागच्या तीन बॉक्सिंग डे कसोटी सामन्यांपैकी तिन्ही सामने जिंकले आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला गेला होता आणि भारताने ऑस्ट्रेलियाला यामध्ये पराभूत केले होते. त्यानंतर २०२० मधील बॉक्सिंड डे कसोटी सामना देखील मेलबर्नमध्येच खेळला गेला होता आणि ऑस्ट्रेलिया संघाला पुन्हा एकदा भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. परंतु या सामन्यात विराट नव्हे तर अजिंक्य रहाणे तर संघाचे नेतृत्त्व करत होता. त्यानंतर आता यावर्षीच्या (२०२१) बॉक्सिंड डे कसोटी सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिका संघाचा पराभव केला आहे, जो सेंचुरियनमध्ये खेळला गेला.
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याचा विचार केला, तर यामध्ये भारताने ११३ धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला कर्णधार विराटने भारताला नाणेफेक जिंकवून दिली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिका संघ १९७ धावा करून सर्वबाद झाला. पहिल्या डावात मोठी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात स्वस्तात बाद झाला. दुसऱ्या डावात भारताने १७४ धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेला शेवटच्या डावात विजयासाठी ३०५ धावांची आवश्यकता होती, पण त्यांचा संघ पुन्हा एकदा २०० धावांच्या आतमध्ये गुंडाळला गेला.
दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या डावात १९१ धावा केल्या, परिणामी भारताने सामना जिंकला. भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलने या सामन्याच्या पहिल्या डावात १२३ धावांची दमदार खेळी केली. यामध्ये त्याच्या १७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याच्या या कामगिरीसाठी राहुलला सामनावीर पुरस्कार दिला गेला.
महत्वाच्या बातम्या –
आयसीसी स्पर्धेत विजय मिळवायचे असेल, तर टीम इंडियाला करावा लागेल ‘हा’ बदल, गावसकरांचा सल्ला
नाद करायचा नाय! कोहली अँड कंपनीने सेंच्यूरियन कसोटी जिंकत रचलाय मोठा इतिहास
सेंच्यूरियन कसोटी फत्ते करत आशियाच नव्हे आशियाबाहेरही चमकली विराटसेना, केला ‘हा’ शानदार किर्तीमान
व्हिडिओ पाहा –