---Advertisement---

फिट राहण्यासाठी विराट कोहली वेगन या अनोख्या जीवन पद्धतीचा करतोय अवलंब

On: सोमवार, ऑक्टोबर 8, 2018 3:16 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार रनमशीन विराट कोहली हा त्याच्या जबरदस्त फिटनेससाठी सुप्रसिद्ध आहे. मैदानात सतत उर्जितावस्था ठेवण्यासाठी त्याने आतापर्यंत खूप मेहनत घेतली आहे.

मैदानावरील उर्जितावस्था टिकून ठेवण्यासाठी, चिकन आणि कबाब खुप आवडीने खाणारा विराट चक्क आता वेगन जीवन पद्धतीचा अवलंब केला अाहे.

एका बातमीनुसार विराट प्राण्यांच्या शरीरातून मिळणाऱ्या प्रथिनांच्या ऐवजी(मांस आणि अंडी)  आता भाजीपाल्यातून आणि सोयाबीनमधून मिळणारे प्रथिने चार महिन्यांपासून घेत असून त्याची पचनशक्ती वाढली असल्याचे समजते.

”दोन वर्षापुर्वी मी जेव्हा साधारण आहार घेत होता. तेव्हा मी पर्याय म्हणून वेगन आहाराकडे पाहत होतो. आता मला आधीच्यापेक्षा मजबूत वाटत आहे.” असे विराटने सांगितले.

विराट हा लहानपणापासून फिटनेसवर लक्ष देत असे. तो याबाबतीत अतिशय जागरुक होता. याबद्दल त्याचे आधीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यापुर्वीच भरभरुन बोलले आहेत.

”क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विराट ज्या पद्धतीने खेळतो आहे, तशी कामगिरी सर्वोच्च फिट खेळाडूच करु शकतो,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

विराटने विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक केले होते. याबरोबर भारतात 3000 धावा करणार तो 11 वा  भारतीय खेळाडू ठरला होता. विराटने सर्वात(123 डावात) जलद 24 शतक ठोकणाऱ्या खेळाडूंची यादीत डाॅन ब्रॅडमन (66 डावात) यांच्यानंतर दुसरा खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे.

काय आहे वेगनडायट- (वेगनिझम)

ह्या संकल्पनेत दररोजच्या आहारात प्राण्यांपासून मिळणारे कोणत्याही प्रकारचे पदार्थ वर्ज मानले जातात. त्यामध्ये दुध आणि दुधापासून बनलेल्या पदार्थाचा देखील समावेश आहे. प्राण्यांचा उपभोग्य वस्तु म्हणून त्याग केला जातो. वेगन पद्धतीत प्राण्यांच्या चामड्यापासून मिळणाऱ्या वस्तू देखील टाळल्या जातात. वेगनिझम स्विकारलेले व्यक्ती फक्त वनस्पतीपासून मिळणाऱ्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करतात.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment