भारतीय संघाने 2019 या वर्षांत खूप चांगली कामगिरी करत अनेक मालिका आणि सामने आपल्या खिशात घातल्या आहेत. परंतु, या वर्षात अशी एक गोष्ट आहे जी भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) बदलायची आहे.
इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या 2019 च्या वनडे विश्वचषकातील (ODI World Cup) उपांत्य फेरीमध्ये न्यूझीलंड (New Zealand) संघाने भारताला पराभूत केले होते. हीच गोष्ट विराटला बदलायची आहे. उपांत्य फेरीत झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात भारताला 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.
“इंग्लंडमध्ये (England) आम्हाला जो पराभव स्विकारावा लागला. त्यामध्ये आम्ही एक गोष्ट संघ म्हणून बदलू इच्छित होतो. परंतु, गोष्टी एका विशिष्ट मार्गाने पुढे जातात कदाचित हे नेहमीच घडत असेल. आज आम्हाला या ठिकाणी पोहोचण्यासाठीच त्या वेळी कठीण प्रसंगातून जावे लागले,” असे स्टार स्पोर्ट्सच्या फॉलोवर्स कार्यक्रमात बोलताना विराट म्हणाला.
रविवारी विंडीजविरुद्ध (Windies) वनडे सामन्यात विजय मिळवल्यानंतर विराट म्हणाला की, ” 2019 हे वर्ष भारतासाठी सर्वात चांगले वर्ष राहिले आहे. विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध झालेला पराभव सोडता, हे एक चांगले वर्ष होते. आम्ही आयसीसी स्पर्धांमध्ये चांगल्या कामगिरीचा पाठलाग करत राहणार आहे.”
यापूर्वी, विंडीजविरुद्ध वनडे मालिका 2-1 च्या फरकाने जिंकल्यानंतर विराट म्हणाला होता की, 2019 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी सर्वात चांगली वर्षांतील एक होते.
भारतीय संघाने या वर्षी खेळलेल्या 8 कसोटी सामन्यांपैकी 7 सामने जिंकले होते. त्यामधील एक कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.
भारताने या वर्षात 28 वनडे आणि 16 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये भारताने अनुक्रमे 19 आणि 9 वेळा विजय मिळवला आहे.
2020 मध्ये भारतीय संघ 5 जानेवारीपासून गुवाहाटी (Guwahati) येथे श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 3 सामन्यांची टी20 मालिकेची सुरुवात करणार आहे.
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत हे खास ५ विक्रम
वाचा👉https://t.co/YJf2Y0EOve👈#म #मराठी #Cricket #HappyBirthdayCook @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 25, 2019
काय सांगता! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विराट कोहलीला केले या संघाचा कर्णधार
वाचा- 👉https://t.co/iKX6ILsUiD👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 25, 2019