---Advertisement---

‘हा’ ट्विटरकर्ता गेल्या १० वर्षांपासून विराट कोहलीला देतोय त्रास; काय आहे नेमकं कारण, घ्या जाणून

On: मंगळवार, जून 1, 2021 8:18 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गेल्या काही वर्षात भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. फलंदाजी असो किंवा संघाचे नेतृत्व, तो दोन्ही गोष्टींमध्ये उत्तम ठरत आहे. त्याचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. परंतु अनेकदा त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. असाच एक किस्सा प्रचंड गाजला होता, जेव्हा विराट कोहलीला एका युजरने १० वर्षांपूर्वी ट्विटरवर शिवीगाळ केली होती, ज्यावर विराटने प्रतिउत्तरही दिले होते. चला तर पाहूया काय होता संपूर्ण प्रकार.

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुंबईमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. त्यामुळे रिकाम्या वेळात विराटने इंस्टाग्रामवर चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितले होते. त्यावर एका चाहत्याने त्याला विचारले होते की,”मिम्स आणि ट्रोल करणाऱ्यांना तुम्ही कसा प्रतिसाद देतात?” या प्रश्नाचे उत्तर देताना विराटने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो सर्वांना आपल्या बॅटने उत्तर देतो, असे सांगताना दिसून येत होते.

यानंतर त्याच्या उत्तरानंतर पुन्हा एकदा १० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेही अनेकांना आठवण झाली.

काय घडलं होतं २०११ मध्ये?
भारतीय संघाने २०११ विश्वचषक आपल्या नावावर केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यावर विराट कोहलीलाही संधी देण्यात आली होती. त्यावेळी विराटने क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांच्या एका समूहाला मधले बोट दाखवले होते, ज्यामुळे विराट कोहलीवर सर्वच स्तरातून टीका केली गेली होती. परंतु याच समूहातील ईशान नावाच्या व्यक्तीने विराट कोहलीला ट्विटरवर टॅग करत शिवीगाळ केली होता.

त्यावर विराट कोहलीनेही, “तुझं अकाउंट बंद होईल” असे लिहिले होते. ईशानने केलेलं ट्विट डिलिट करण्यात आले असले तरी ही त्याचे अकाउंट डिलिट करण्यात आले नाही. हा सर्व प्रकार घडून १० वर्ष पालटली आहेत, तरी देखील हा युजर विराटची पाठ सोडत नसल्याचे दिसत आहे. त्याने वेळोवेळी ट्विटरवर विराटला टॅग करत त्याचं अकाउंट बंद न झाल्याचे सांगत असतो. त्याने १० वर्षे झाल्यानंतरही विराटला टॅग करत १० वर्षे पूर्ण झाल्याची आठवण करुन दिली होती.

हा ट्विटरकर्ता विराटची पाठ सोडत नसला तरी त्याच्याकडे विराटने नंतर कधीही लक्ष दिले नाही. गेल्या काही वर्षांपासून विराटच्या फलंदाजीसह त्याच्या वागणुकीमध्ये ही खूप फरक जाणवला आहे. तो अनेकदा आता सोशल मीडियावर येणाऱ्या प्रतिक्रियांवर व्यक्त होत नाही. तो अशा गोष्टींकडे आता दुर्लक्ष करत असल्याचे त्यानेच सांगितले आहे.

भारतीय संघाला येत्या १८ जून ने २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात विराट भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय संघाला बसणार फटका? ‘या’ दिग्गज गोलंदाजाला कोरोनाची लक्षणे; रिपोर्ट्सची प्रतिक्षा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक

केकेआरला तिसऱ्या जेतेपदाची आस, मॉर्गनच्या अनुपस्थित ‘हे’ खेळाडू बनू शकतात नवे कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---