सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या स्टेडियमवर खेळला जात आहे. त्यातील दुसरा दिवस खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मिचेल सँटनरच्या फिरकीविरूद्ध फसला आणि बाद होऊन तंबूत परतला. यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला. पण कोहलीच्या आंतरराष्ठ्रीय क्रिकेटमधील घरच्या मैदानावर फिरकीपटूंविरूद्ध आकडेवारी खूपच खराब राहिली आहे.
विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये छाप पाडण्यात अपयशी ठरला. न्यूझीलंडविरूद्ध पुण्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कोहली अवघ्या एका धावेवर बाद झाला. डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने कोहलीला बोल्ड केले. सँटनरच्या फुल टॉस बॉलवर कोहली बाद झाला. कोहली बाद होताच पुण्याच्या मैदानात सर्वत्र शांतता पसरली.
Virat Kohli out ????????????#ViratKohli #INDvsNZ pic.twitter.com/49ytD5Jewv
— Virat (@chiku_187) October 25, 2024
घरच्या मैदानावर फिरकीपटूंविरुद्ध कोहलीचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. कोहली 2021 पासून 22 डावांमध्ये 19 वेळा फिरकीपटूंविरूद्ध बाद झाला आहे. कोहलीचा रेकाॅर्ड फिरकीपटूंविरुद्ध, विशेषत: डावखुऱ्या फिरकीपटूंविरूद्ध आणखी वाईट झाला आहे. त्यानंतरच्या 21 डावांमध्ये कोहलीने डावखुऱ्या फिरकीपटूंविरूद्ध 28.78च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यापूर्वी, 2012 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या कोहलीने 2020 पर्यंत डावखुऱ्या फिरकीपटूंविरुद्ध 74.64च्या सरासरीने 1,866 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हटवली वॉर्नरवरील आजीवन कर्णधारपदाची बंदी
आयपीएल लिलावात कोणत्याही किंमतीत सुंदरला विकत घेऊ शकते सीएसके, वाचा यामागील कारणे
भारत-अफगाणिस्तान संघात रंगणार सेमीफायनल थरार! कधी आणि कुठे होणार सामने





