---Advertisement---

संघात स्थान देण्यासाठी एकेकाळी वडिलांकडे मागितली लाच, खुद्द विराटनेच केला खुलासा

On: गुरूवार, नोव्हेंबर 5, 2020 10:26 AM
---Advertisement---

जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आघाडीवर आहे. त्याला ‘रनमशीन’ या नावानेही ओळखले जाते. आज (5 नोव्हेंबर) त्याचा 32 वा वाढदिवस आहे. 5 नोव्हेंबर 1988 रोजी नवी दिल्ली येथे त्याचा जन्म झाला होता. क्रिकेटमध्ये उंच शिखर गाठण्यात त्याच्या मेहनतीशिवाय त्याच्या वडिलांनीही खूप संघर्ष केला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.

वडिलांकडे मागितली होती लाच
यावर्षी मे महिन्यात विराट कोहलीने क्रिकेट क्षेत्रातील एका व्यक्तीने वडिलांकडून लाच मागितल्याचा खुलासा केला होता. फुटबॉलपटू सुनील छेत्रीसोबत इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये बोलताना कोहलीने सांगितले की, “एकावेळी वडिलांकडून राज्य क्रिकेट संघात निवड करण्यासाठी पैसे मागितले गेले होते. मी त्यावेळी चांगला खेळत होतो. एकदा राज्यस्तरावरील क्रिकेटमध्ये कोणीतरी माझ्या वडिलांना सांगितले की संघात निवड होण्यासाठी कोणतीही समस्या नाही, परंतु त्यासाठी काहीतरी अतिरिक्त करावे लागेल. म्हणजेच ते पैशासाठी विचारत होते. ते कशाची मागणी करत आहेत हे समजल होतं. परंतु वडिलांनी वकील होण्यासाठी खूप कष्ट केले होते. कष्ट करणारे लोक या गोष्टींना महत्व देत नाही.”

त्यावेळी खूप रडलो होतो-विराट
कोहली म्हणाला की, “वडिलांनी प्रशिक्षकांना हे स्पष्ट केले होते की त्यांचा मुलगा जे काही करेल ते स्वतःच्या बळावर करेल.परंतु लाच देऊन खेळ खेळायचा नाही. त्यावेळी मी खूप रडलो होतो. परंतु वडील म्हणाले की, अशी कामगिरी कर, जी कुणालाही जमली नाही. वडिलांची ही गोष्ट कायमच माझ्या लक्षात आहे.”

विराटची कसोटी कारकीर्द
विराट कोहलीने 86 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 53.63 च्या सरासरीने 7240 धावा केल्या आहेत. यामध्ये 27 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. 254 ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.

विराटची वनडे कारकीर्द
विराटने 248 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामध्ये 59.34 च्या सरासरीने 11867 धावा केल्या आहेत.यामध्ये 43 शतके आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे. 183 ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.

विराटची आयपीएलमधील कारकीर्द
इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने 191 सामने खेळले आहेत.यामध्ये त्याने 38.38 च्या सरासरीने 5872 धावा केल्या आहेत. यात 5 शतके आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे.113 ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

शिखर धवन म्हणतो, ‘तो’ संघात असला की मला मुक्तपणे खेळायची संधी मिळते

टेबलवर पाय ठेवून मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या क्रिकेटरची निवृत्ती

माझे बाबा सगळ्यात भारी! रहाणेची इवलुशी मुलगी बनलीय चीयरलीडर; भन्नाट व्हिडिओ व्हायरल

ट्रेंडिंग लेख –

‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!

टेकडीचा हिमालय होताना!

हॅप्पी बर्थडे विराट …!!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---