---Advertisement---

हार्दिकने शेअर केला लाडक्या लेकासोबतचा ‘क्यूट व्हिडिओ’, अनुष्काची प्रेमळ प्रतिक्रिया ठरली लक्षवेधी

On: शुक्रवार, एप्रिल 16, 2021 11:59 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा महान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि पत्नी आणि नताशा स्टॅनकोविच हे दोघे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते दोघे त्यांचे फोटो-व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असतात, जे लोकांना खूप आवडतात. परंतु आता हार्दिक पंड्याने त्याचा मुलगा अगस्त्य पंड्या सोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हा पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून हा व्हिडीओला लोकांनी खूप पसंतदेखील केलं आहे. या व्हिडिओवर भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे.

हार्दिक पंड्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक आपला मुलगा अगस्त्यला लाडाने खेळवताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ खरोखरच मनाला भिडणारा आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक आपल्या मुलावरती खूप प्रेम दाखवत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने “माझा मुलगा, माझे हृदय, माझे जग” असे लिहले आहे.

इथे पाहा व्हिडिओ-

https://www.instagram.com/reel/CNpHIN2jO9e/?igshid=18k96g1jssq08

हा व्हिडिओ पाहून भारतीय संघाचा कर्णधार कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा स्वत:ला रोखू शकली नाही आणि तिने हृदयाचा इमोजी पाठवत पोस्टवर प्रतिक्रिया दिली.

Photo Courtesy: Instagram/@hardikpandya93

यापूर्वीही रविवारी (11 एप्रिल) रोजी हार्दिक पांड्या मस्ती करताना दिसला होता. त्यामध्ये त्याने आपल्या मुलासह सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना, “मला अशाच प्रकारचा रविवार खूप आवडतो.” असे लिहले होते. एवढेच नाही तर त्याने यासोबत सूर्य आणि हृदयाची इमोजी देखील पोस्ट केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ कारणामुळे चुरसीची लढत जिंकण्यात दिल्ली कॅपिटल्स ठरली अपयशी, कर्णधार पंतने दिली प्रतिक्रिया

पहिल्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयाबद्दल संजूने मांडले मत; म्हणाला, “मी १०० वेळा तो सामना खेळलो तरी…”

अटीतटीच्या लढतीनंतर राजस्थानची विजयाची नौका पार, कर्णधाराने ‘या’ खेळाडूंना म्हटले विजयाचे शिल्पकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---