आयपीएल 2021 चा सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघात खेळवण्यात आला. या सामन्याची खास गोष्ट म्हणजे, दोन्ही संघ या हंगामात आपल्या नवीन कर्णधारांसह मैदानावर उतरले होते. शेवटच्या षटकांपर्यंत चाललेल्या या रोमांचक सामन्यात राजस्थानने 3 गडी राखून दिल्ली संघावर विजय मिळवला. या सामन्यानंतरच्या सादरीकरणात राजस्थानचा कर्णधार सॅमसनने संघातील दोन खेळाडूंना विजयाचे श्रेय दिले. त्याबरोबर पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवाबद्दलही त्याने वक्तव्य केले.
सॅमसन सामन्यानंतरच्या सादरीकरणात म्हणाला की, “आम्हाला डेविज मिलर आणि ख्रिस मॉरिसकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण खरे सांगायचे झाले तर या कठीण परिस्थितीत सामना जिंकणे खूपच अवघड होते. परंतु मला वाटते की विजयाची रेखा गाठण्यासाठी या खेळाडूंनी खूप चांगली खेळी केली. हे सर्व परिस्थितीनुसार आहे. सामन्यात सुरुवातीपासूनच खेळपट्टी खूप चिकट होती. त्यामुळे चांगली कामगिरी करणे फार महत्वाचे होते. त्यामध्ये तीन डावखुरे वेगवान गोलंदाज असणे ही एक आमच्या संघासाठी चांगली गोष्ट ठरली. आमचे तिन्ही वेगवान गोलंदाज एकमेकांपेक्षा बरेच वेगळे असल्याने आम्ही त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो.”
पुढे बोलताना त्याने म्हटले की, “चेतन सकारियाशी आम्ही चर्चा केली असून त्याला त्याच्या गोष्टींबद्दल खूप आत्मविश्वास व स्पष्टता आहे. तर त्याचबरोबर पहिल्या सामन्यात मॉरिसला अंतिम षटरात एक धाव घेण्यास नकार देण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल मी जास्त काही बोलू शकत नाही. कारण त्यावेळी मी जास्त काही करू शकत नव्हतो. म्हणून मी माझ्या मनामध्ये प्रार्थना करत होतो. परंतु मी पुन्हा शंभर वेळा जरी तसा सामना खेळला, तरी त्या परिस्थितीत मी एक धाव घेणार नाही.”
राजस्थानच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयी सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रिषभ पंतच्या 51 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 8 गडी गमावून 147 धावा केल्या. यामध्ये राजस्थानकडून खेळणाऱ्या जयदेव उनाडकटने 3 आणि मुस्तफिजुर रहमानने 2 गडी बाद केले.
नंतर फलंदाजी करीता उतरलेल्या राजस्थान संघाचा अर्धा संघ अवघ्या 42 धावांत तंबूत परतला. परंतु यानंतर मिलरने 62 धावांची अर्धशतकी खेळी आणि त्यानंतर ख्रिस मॉरिसने 18 चेंडूत 36 धावांची खेळी करून राजस्थान संंघाला शेवटच्या षटकात 3 गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
इज्जत भी, पैसा भी! पहिल्या सामन्यातील ‘त्या’ प्रसंगाची काढली कसर; दिग्गजाकडून मॉरिसचं हटके कौतुक
RRvDC: ‘असे’ केले दिल्लीच्या फलंदाजांना बाद होण्यास प्रवृत्त; ‘सामनावीर’ जयदेव उनाडकटचा उलगडा
धोनी तो धोनीच! ‘माही’च्या स्टाईलमध्ये पंतचा फलंदाजाला यष्टीचीत करण्याचा प्रयत्न अन्.., बघा व्हिडिओ






3 माफीनामे आणि मेस्सीसाठी खास मॅसेज! 24 तासांमध्ये रोनाल्डोची दुसरी बाजू समोर