भारतानं 2024चा टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता तो फक्त टी20 आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याची श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तत्पूर्वी कोहली या मालिकेत इतिहास रचण्याच्या पायरीवर उभा आहे.
2008 मध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीन (Virat Kohli) आतापर्यंत भारतासाठी एकूण 530 सामने खेळले आहेत. त्यामध्ये कसोटी, एकदिवसीय, टी20 या तिन्ही फॉरमॅटचे सामने समाविष्ट आहेत. कोहलीनं या सामन्यांमध्ये 53.55च्या सरासरीनं 26,884 धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्यानं 116 धावा केल्या तर तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याची एकूण धावसंख्या 27 हजार धावा होईल. या रेकाॅर्डपर्यंत फक्त तीन दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (34,357), कुमारा संगकारा (28,016) आणि रिकी पाँटिंग (27,483) पोहचू शकले आहेत.
सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंबद्दल बोलायचं झालं तर विराट कोहलीशिवाय (Virat Kohli) 20 हजार धावा करणारा एकही फलंदाज नाही. सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीनंतर जो रुटनं (Joe Root) (19,355) धावा केल्या आहेत. तो दुसऱ्या स्थानावर आहे. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) 19,077 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामधील एकदिवसीय मालिकेला 2 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जाहीर देखील झाला आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. या मालिकेत कोहलीनं 116 धावा केल्या तर तो महान खेळाडू सचिन तेंडुलकर, कुमारा संगकारा आणि रिकी पाँटिंग यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा चौथा खेळाडू ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
नीता अंबानी यांची ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’च्या सदस्यपदी एकमताने फेरनिवड
“सीएसकेकडून खेळणे देवाने दिलेली भेट आहे” संघात निवड झाल्यानंतर श्रीलंकन खेळाडू भावूक
ज्याला भारताने नाकारले, त्याने इंग्लंड गाजवले..! अजिंक्य रहाणेची 9 चौकारांसह 71 धावांची वादळी खेळी