भारतीय क्रिकेट रसिंकाचे लक्ष सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेवर आहे. ४ ऑगस्टपासून उभय संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. इंग्लंडच्या साउथम्पटनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर विराट आणि संघासाठी ही मालिका जिंकणे खूप महत्त्वाचे असणार आहे. तसेच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचीही या मालिकेने सुरुवात होणार आहे.
त्यामुळे यापुर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील चूका टाळण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. अशात गोलंदाजी विभागात मोठा बदल होणार असल्याचे समजत आहे.
भारताने न्यूझीलंडविरुद्ध ३ वेगवान गोलंदाज आणि २ फिरकीपटूंची निवड केली होती. परंतु वेगवान गोलंदाजीस पोषक असलेल्या इंग्लंडच्या मैदानांवर भारताची संघनिवड चुकीची ठरली. मोहम्मद शमीला वगळता जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा हे अनुभवी वेगवान गोलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे इशांत किंवा बुमराहला डच्चू देत मोहम्मद सिराजला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. बुमराहपेक्षाही जास्त इशांतच्या स्थानावर टांगती तलवार आहे.
बीसीसीआयच्या सूत्राने न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार, ‘संघ व्यवस्थापन फिरकी गोलंदाजी अष्टपैलू आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांना संघात कायम ठेवू इच्छित आहे. त्यामुळे कदाचित सिराज इशांतची जागा घेऊ शकतो. सिराजचे इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खेळणे जवळपास निश्चित झाले आहे.’
२७ वर्षीय सिराजला केवळ ५ कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. परंतु त्याने ऑस्ट्रेलियाच्या भूमित दमदार प्रदर्शन करत आपल्यातील प्रतिभा सिद्ध केली होती. याबरोबरच तो घरच्या मैदानांवरही प्रभावी ठरला आहे. त्यातही इंग्लंडच्या स्विंग गोलंदाजीस पोषक खेळपट्टींकडून त्याला भरपूर मदत मिळू शकते. त्यामुळे कर्णधार विराट कोहली हुकमी एक्का सिराजला इंग्लंडविरुद्ध खेळवण्याच्या पक्षात असेल.
सिराजने आतापर्यंत ५ कसोटी सामन्यात २.८२ च्या इकोनॉमीने १६ विकेट्स चटाकवल्या आहेत. दरम्यान १ वेळा त्याने एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा
राखीव खेळाडू- अभिमन्यू ईस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जन नागवासवाला
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकावर पुन्हा टांगती तलवार, यंदाही होऊ शकतो रद्द? गांगुलीने दिला इशारा
‘मला हजारो लोकांनी नको नको त्या शिव्या दिल्या’; समालोचक दिनेश कार्तिकने मांडली व्यथा
SLvIND: पडीक्कलच्या फॉर्मने वाढवली टीम इंडियाची चिंता, सैनीच्या गोलंदाजीवर दिसला संघर्ष करताना