भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात १ जुलैपासून ऍजबस्टन येथे ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा पुनर्नियोजित सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढली आहे. भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्याच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशात रोहितच्या अनुपस्थितीत माजी कर्णधार विराट कोहली याच्यावर नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार नाही, असे त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी म्हटले आहे.
रोहितची (Rohit Sharma) शनिवारी (२५ जून) रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळली होती. याच कारणामुळे तो लिसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यातही खेळला नव्हता. यानंतर सोमवारी (२७ जून) बीसीसीआयने (BCCI) रोहितचा पर्यायी सलामी खेळाडू म्हणून मयंक अगरवाल याला कसोटी संघात सहभागी केले आहे. मयंक (Mayank Agarwal) सोमवारी इंग्लंडसाठी रवानाही झाला आहे. परंतु अद्याप रोहितच्या जागी भारतीय संघाचे (Team India) नेतृत्त्व कोण करेल? याबद्दल अधिकृत माहिती दिली गेली नाहीय.
भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह, यष्टीरक्षक रिषभ पंत आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांपैकी एकावर ही जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. परंतु विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार यांना वाटते की, रोहितच्या अनुपस्थित संघ व्यवस्थापन पुन्हा विराटच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवणार नाही.
वृत्तसंस्था आयएएनएसशी बोलताना राजकुमार (Rajkumar Sharma) म्हणाले की, “विराटला भारताच्या कसोटी संघाच्या नेतृत्त्वापदावरून हटवले गेले नाही, तर त्याने स्वत:हून कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे मला नाही वाटत की, मी त्याला पुन्हा भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना बघू शकतो. मला नाही माहिती की, संघ निवडकर्ते किंवा बीसीसीआय काय निर्णय घेतील. विराट एक टीम-मॅन आहे आणि त्याला भारतीय संघासाठी चांगले प्रदर्शन करायचे आहे. मलाही वाटते की, त्याने नेतृत्त्वाऐवजी चांगले वैयक्तिक प्रदर्शन करत भारतीय संघासाठी योगदान द्यावे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IREvsIND: ऋतुराज दुखापतग्रस्त असताना पुण्याच्या भिडूला मिळू शकते संधी
ICC WTC: न्यूझीलंड हरला, भारताला टेंशन देऊन गेला; जाणून घ्या काय आहे समीकरण
IREvsIND: ‘पंड्या एँड कंपनी’ मालिका जिंकणार की पाऊस करेल खेळ खराब? वाचा सविस्तर