भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक शतकं आहेत. परंतु २०१९ नंतर त्याला एकही शतक करण्यात यश नाही आले आहे. २००९ मध्ये विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून हे पहिलेच वर्ष आहे ज्यात विराट कोहलीला शतक करण्यापासून वंचित राहावे लागले आहे.
२०१९ मध्ये त्याने बांगलादेश संघाविरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्याला जास्त सामने खेळता आले नाही. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध त्याला एकच कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर पितृत्व रजा घेत तो माघारी परतला होता. याच संदर्भात इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मायकेल वॉन यांच्या मते विराट कोहली लवकरच फॉर्म मध्ये येईल आणि तसेच इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यात १-२ शतके देखील झळकावेल.
“विराट कोहली येत्या सामन्यात शतक झळकावेल”
मायकेल वॉन यांनी नुकेतच कर्णधार विराट कोहलीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “मी विराट कोहली बद्दल चिंतेत नाही आहे. आणि मला असे वाटते की विराटलाही या गोष्टीची फारशी चिंता भासत नसेल. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत विराट कोहली १-२ शतकं करणार, यात काहीच शंका नाही. विराट कोहली या सामन्यात जसा बाद झाला, तसा शॉट कोणताही फलंदाज खेळू पाहत नाही. ऑफ स्पिनरने ऑफ स्टंप च्या बाहेर फेकलेल्या चेंडूला तुम्ही बचावात्मकरित्या नाही खेळू शकत.”
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचे नाव दशकातील सर्वोत्तम फलंदाजमध्ये का घेतले जाते, हे तो मैदानावर आपल्या खेळातून नेहमीच दाखवत असतो. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ८७ कसोटी सामन्यात ५३.४ च्या सरासरीने ७३१८ धावा केल्या आहेत. यात २७ शतक आणि २३ अर्धशतकातकांचा समावेश आहे.
तसेच त्याने खेळलेल्या २५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५९.३ च्या सरासरीने १२०४० धावा केल्या आहेत. यात ४३ शतक आणि ६० अर्धशतकांचा समावेश आहे. याचबरोबर ८५ टी- २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५०.५ च्या सरासरीने त्याने २९२८ धावा केल्या आहेत. यात २५ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
पुन्हा एकदा फ्लॉप झाल्याने रोहितवर भडकले नेटकरी, संघाबाहेर काढण्याचीही केली मागणी
आयएसएल २०२०-२१ : सहा गोलांच्या थरारात मुंबई सिटी-गोवा बरोबरी
म्हणून ट्विटरकरांना आली वीरेंद्र सेहवागची आठवण!