मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं वाटत होतं. ऑस्ट्रेलियाच्या 474 धावांना प्रत्युत्तर देताना भारतीय फलंदाजांनी एकवेळ 2 गडी गमावून 153 धावा केल्या होत्या आणि संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता. त्यानंतर 41व्या षटकात यशस्वी जयस्वाल 82 धावांवर धावबाद झाला. विराट कोहलीसोबत समन्वयाच्या अभावामुळे जयस्वालचं शतक हुकलं. त्यामुळे आता टीम इंडियावर फॉलोऑनचा धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे जयस्वालच्या रनआऊटवरून माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि संजय मांजरेकर यांच्यात झालेल्या जोरदार वादाचा व्हिडिओ समोर आला आहे.
दुसऱ्या दिवशी भारतानं 5 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या असून पहिल्या डावात संघ अजूनही 310 धावांनी मागे आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यशस्वी जयस्वालच्या धावबादवर इरफान पठाण आणि संजय मांजरेकर आपलं मत मांडत होते. एकीकडे मांजरेकर यांनी कोहलीवर कडाडून टीका केली, तर दुसरीकडे इरफानचं मत त्यांच्या विरुद्ध होतं.
प्रथम संजय मांजरेकर यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, “बॉल संथ गतीनं जात होता. मला वाटत नाही की विराट कोहली तेथे धावबाद झाला असता. तो जयस्वालचा कॉल होता. ही धाव घेणं धोकादायक होतं मात्र डेंजर एंडकडे विराट कोहली नाही तर यशस्वी जयस्वाल धावत होता. जयस्वालचा निर्णय चुकीचा असेल तर तो नॉन-स्ट्राइकिंग एंडला बाद झाला असता. विराटनं केलेली ही चूक बालिश होती.”
संजय मांजरेकर यांच्या या मताचा विरोध करताना इरफान पठाण म्हणाला, “विराट कोहलीला कदाचित धावा घेण्याबाबत आत्मविश्वास नव्हता कारण चेंडू लगेच क्षेत्ररक्षकाकडे गेला. नॉन स्ट्रायकिंग एंडवर उभ्या असलेल्या विराट कोहलीलाही धोका टाळण्यासाठी पळण्यास नकार देण्याचा अधिकार आहे.”
Heated Argument Between Sanjay Manjrekar And Irfan Pathan, Sanjay Manjrekar Was Defaming Virat Kohli While Irfan Pathan Was Defending Virat Kohli ( On Yashasvi Jaiswal Run Out)#INDvsAUS #ViratKohli #YashasviJaiswal#AUSvINDIA pic.twitter.com/8YmOcA8JyL
— Harsh 17 (@harsh03443) December 27, 2024
हेही वाचा –
IND vs AUS; रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप होण्याची 3 मोठी कारणे
भारतावर फॉलोऑनचे संकट, अर्धा संघ तंबूत परत, बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वरचढ
IND vs AUS; भारताला चौथा धक्का! जयस्वाल पाठोपाठ कोहलीही तंबूत